प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांची बांद्यात सापळा रचून तिन डंपरवर कारवाई..
▪️तहसीलदार राजाराम म्हात्रे करणार तिन्ही डंपरवर पुढील कारवाई..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा,दि.१३: कुडाळहुन गोव्यात बेकायदा वाळू व खडीची वाहतूक करताना तीन डंपरवर खुद्द सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी बांद्यात मुंबई-गोवा महामार्गावर सापळा रचून कारवाई केली. डंपरवर कारवाई करून हे डंपर पुढील कारवाईसाठी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या ताब्यात देण्यात आलेत. या कारवाईत प्रत्येकी १ लाख ३० हजार याप्रमाणे ३ लाख ९० हजार रुपये दांडात्मक कारवाई करण्यात आली.
ही कारवाई मुंबई-गोवा महामार्गावर बांदा शहरानजीक काल सायंकाळी उशिरा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती प्रांताधिकारी खांडेकर यांना मिळाली होती. त्यानुसार काल सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावर बांदा शहरानजीक सापळा रचण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीच्या आधारे तिन्ही डंपरची तपासणी करण्यात आली. त्यावेळी बेकायदा वाळू व खडी वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. तिन्ही डंपरच्या चालकांकडे विचारणा केली असता पासमध्ये खाडाखोड करण्यात आली होती. चालकांनी समर्पक उत्तर न दिल्याने तिन्ही डंपर ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी तहसीलदार म्हात्रे यांच्या ताब्यात देण्यात आलेत.
_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_
💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..
_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻♂️*_
*💁🏻♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

