आणखीकोकणमहाराष्ट्रसंपादकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 “न्यू गोवा”चा खेळ ; सिंधुदुर्ग विक्रीची नवी पद्धत

🛑 कोकण लाईव्ह च्या संपादकीय लेखाने उच्चभ्रू दलालांना भरली धडकी ; कायदेशीर कारवाईची पोकळ धमकी

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ संपादकीय : सीताराम गावडे

🎴सिंधुदुर्ग, दि-२१:- सिंधुदुर्ग हा जिल्हा नैसर्गिक साधन संपत्तीने, संस्कृतीने आणि इतिहासाने समृद्ध, परंतु गेल्या दोन दशकांपासून या जिल्ह्यातील जमिनीवर हळूहळू बाहेरचे भांडवलदार, बिल्डर लॉबी आणि जमीनमाफिया डोळा ठेवून बसले आहेत. याचाच ताजा नमुना म्हणजे शिरवल-दोडामार्ग धरण परिसराला “नॉर्थ गोवा / न्यू गोवा” असे नाव देऊन चालवली जाणारी प्लॉट्सची बाजारपेठ.याबातच्या उठावा नंतर कायदेशीर कारवाईची धमकी देणाऱ्या उच्चभ्रू दलालांना आम्ही एवढेच सांगतो की, तुम्ही आम्हाला नोटीस पाठविण्याची हिंमतच करावी नाही तुमचे पुराव्यासहीत श्राध्द घातले तर बघा.आम्ही अशा कोल्हेकुई ला भिक घालत नाही हे ध्यानात ठेवा.

 

*“न्यू गोवा”ची चमक – पण कोणत्या किमतीवर?*

 

सोशल मीडियावर, वेबसाइट्सवर, आणि रिअल इस्टेट पेजेसवर मोठ्या थाटामाटात जाहिरात झळकते “Shirwal, North Goa” असे लख्ख शीर्षक.

“फार्महाऊस प्लॉट्स ~1100 चौ.मी. पासून”“₹1.43 कोटींपासून किंमत”

“नॅचरल लेक, 110 एकर कॅम्पस, क्लबहाऊस, लक्झरी व्हिला, ग्रीन झोन” अशा सुखसोयींची झगमगती स्वप्नरंजन.परंतु या जाहिरातींमागे वस्तुस्थिती काय आहे?हा भूभाग सिंधुदुर्ग जिल्ह्यात, महाराष्ट्रात आहे. धरणाच्या सुरक्षित पट्ट्यात येणाऱ्या जमिनीवर कसा काय अशा प्रकारचा विकास? महाराष्ट्रातील जमिनीला “गोवा”ची लेबल लावून विक्री करण्यामागे नेमका डाव काय? ग्राहकांची फसवणूक नाही का?

 

*दलालीचे नवे तंत्र*

 

ही मंडळी स्वतःला “उच्च शिक्षित, कॉर्पोरेट कल्चरमध्ये काम केलेले” म्हणून मिरवतात. “आम्ही कोणा ग्राहकाला फसवत नाही, आम्ही गुंतवणूकदारांना ग्रीन प्रोजेक्ट्स देतो” असे यांचे म्हणणे. पण प्रश्न असा की जिल्ह्याची ओळख मिटवून, “नॉर्थ गोवा”च्या नावाने विक्री करणे म्हणजे जाणीवपूर्वक फसवणूकच नाही का?

या दलालांचे पोसलेले खिसे सिंधुदुर्गाच्या मातीवरून झालेले कोट्यवधी रुपयांचे उलाढाल लपवू शकत नाहीत.सोशल मीडियावर बातमी झळकताच त्यांचे पाय घसरतात, धमक्या दिल्या जातात, कायद्याच्या धमक्या दाखवल्या जातात. हेच खरे त्यांचे अपराधी मनाचे लक्षण नाही का?

 

*सिंधुदुर्गाची जनता “दुधखुळी” नाही*

 

हरियाणा, दिल्ली, गुजरातमधून येणाऱ्या रिअल इस्टेट लॉबींना वाटते की कोकणातील जनता भोळी आहे. पण आता काळ बदललाय. जिल्ह्यातील लोकांना या माफियांना ओळखण्याचे पुरेसे भान आलंय.

पत्रकारितेच्या माध्यमातून, स्थानिक संघटनांच्या दबावातून आणि सोशल मीडिया चळवळीमुळे या काळ्या धंद्याचा पर्दाफाश होतो आहे.

“जमिनीचा भाव वाढवला म्हणजे विकास” ही समजूत आता पटलत नाही. कारण लोकांना माहिती आहे हा विकास नसून, स्थानिकांच्या डोक्यावर चाललेली दलाली आहे.

 

*प्रशासनाची जबाबदारी*

 

या सर्व प्रकारात सर्वात मोठा प्रश्न प्रशासनाच्या भूमिकेवर आहे.

धरण क्षेत्र विकासासाठी योग्य आहे का, याचा ठोस अहवाल का नाही?

सिंधुदुर्गच्या जमिनीवर “गोवा”ची शिक्कामोर्तब विक्री थांबवण्याची जबाबदारी कोणाची? जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, टाऊन प्लॅनिंग, पर्यावरण विभाग हे सर्व कोणाच्या दबावाखाली गप्प आहेत?

 

*निष्कर्ष – श्राद्ध करायची वेळ जवळ आली आहे*

 

सिंधुदुर्गची जमीन, येथील समुद्रकिनारे, डोंगररांगा हे काही विक्रीसाठीचे माल नाहीत. हे कोकणच्या ओळखीचे जीवंत दस्तऐवज आहेत. दलालांची पोटं एवढी भरली आहेत की आता ती फुटायची वेळ आली आहे. या माफियांना थांबवले नाही, तर जिल्ह्याची ओळख “न्यू गोवा” नव्हे तर “हरवलेला सिंधुदुर्ग” अशी व्हायला वेळ लागणार नाही.

कोकण लाईव्ह सारखी माध्यमे जेव्हा उघडपणे या प्रकरणाचा पर्दाफाश करतात, तेव्हा समाजाने त्यांना साथ द्यायलाच हवी. अन्यथा उद्या आपल्याच पिढ्यांना सांगावं लागेल “आम्ही झोपेत असताना सिंधुदुर्ग विकला गेला.”

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!