🛑सावंतवाडीतील मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा!
*🛑सावंतवाडीतील मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २०:-* शहरात मोकाट गुरांचा वावर वाढत चालला आहे. या गुरांमुळे वाहतुकीला अडथळा होत असून त्यांच्या रस्त्यावर मोकाट फिरण्याने रात्रीच्या वेळेला अपघातासारखे प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे न.पा. प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ठाकरे शिवसेनचे सावंतवाडी प्रवक्ते आशिष सुभेदार यांनी केली.
शहरात भटके कुत्रे, मोकाट गायींचा वावर वाढला आहे. बहुतांशी या गुरांचे मालक त्यांना मोकळे सोडत असून त्यांची योग्य निगा राखली जात नाही. ही गुरे रस्त्यावर बेवारस फिरतात. रात्रीच्या वेळी वाहन चालविताना गुरे नजरेस पडत नसल्याने अपघात होत आहेत. समाजमंदिर, भटवाडी, जिमखाना, खासकिलवाडा सालईवाडा, शिरोडा नाका, भाजी मार्केट येथे हमखास मोकाट गुरे असतात. मोती तलावाच्या फुटपाथवर सातत्याने फिरतात. नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. शहराच्या सौंदर्यालाही बाधा पोहचत आहे. त्यामुळे या गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. सध्याच्या भाजी मंडई परिसरातः मोकाट गुरांसाठी कोंडवाडा उभारण्यात आला होता. मात्र, बेवारस बैल व गायींची संख्या वाढू लागल्याने ती जागा अपुरी पडू लागली. हा कोंडवाडा बंद करून त्याजागी स्टैंड करण्यात आल्याने आता भटक्या गायींसाठी जागाच उरलेली नाही, अशी स्थिती आहे. या गायींना एका ठिकाणी ठेवून त्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा, मोकाट सोडल्यास त्यांना दंड आकारावा, अशी मागणी सुभेदार यांनी केलीय.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

