🛑”ट्रम्प तात्याला खडसावलं – सावंतवाडीचा दमदार दौरा अमेरिकेत!”
*🛑”ट्रम्प तात्याला खडसावलं – सावंतवाडीचा दमदार दौरा अमेरिकेत!”*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ लेखक : नंदू पाटील,सावंतवाडी*
*🎴सावंतवाडी, दि- १३:-* सावंतवाडीतील राजकारणात जेवढं भांडण, तेवढाच संवाद अमेरिकेतही असावा असं मित्रांना वाटलं असावं. म्हणून त्यांनी मला सल्ला दिला –
“तुम्ही अमेरिकेला गेलात तर ट्रम्पला थोडं कानउघाडणी करा… भारताशी जरा जास्त दोस्ती करूनही पाकिस्तानवर जास्त प्रेम करतोय तो!”
मी पण ठरवलं – चला, अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसला आपलं सावंतवाडीचं व्हाईट बोर्ड घेऊन जाऊ.
न्यूयॉर्कचा टॉवर, नायगारा धबधबा बघून थेट वॉशिंग्टनला कूच! व्हाईट हाऊसजवळ पोहोचतो तर काय…
तात्या ट्रम्प बाहेरच उभा, चेहरा बघून वाटलं जणू वेंगुर्ल्याच्या बाजारातून कांद्याच्या भावात फसवून आल्यासारखा अपराधी भाव!
मी थेट विचारलं –
“अहो तात्या, भारताला मिठी मारली, वचनं दिलीत, पण पाकिस्तानला दुधाची टाकी चालूच का?”
तात्या थोडा चुळबुळला. मी लगेच 9/11 चा किस्सा, दहशतवाद्यांची यादी, आणि भारतावरचे टॅरिफ सगळं तोंडावर वाचून दाखवलं.
पाकिस्तानला मदत म्हणजे ‘सापाला दुध पाजून मग चावून घेणं’ हे मी स्पष्ट सांगितलं.
इतक्यात मेलानिया आणि इवांका बाहेर – “घरच्या दारात असं ओरडणं बरं दिसत नाही” असं सांगायला.
मी म्हटलं – “आमच्या सावंतवाडीत तर चौकातच होते लोक, फेसबुक लाईव्हवर भांडत!”
शेवटी मी तात्याला अट घातली –
“पत्रकार परिषद घेऊन भारतविरोधी निर्णय रद्द करा, नाहीतर सावंतवाडी पद्धतीने भरीव आंदोलन करीन.”
तात्या गडबडून लगेच निर्णय मागे घेतो, मला मिठी मारतो, आणि चहा-पाणी देतो.
माझं समाधान झालं… पण काय, एवढ्यात डोळे उघडले… झाडाखाली दुपारी गोड झोप घेत होतो!
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

