🛑बांद्यात आढळलेल्या अघोरी वस्तू प्रकरणी सखोल चौकशी करा – अंनिसचे विजय चौकेकर यांची मागणी.
*🛑बांद्यात आढळलेल्या अघोरी वस्तू प्रकरणी सखोल चौकशी करा – अंनिसचे विजय चौकेकर यांची मागणी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि- ०६:-* बांदा बाजारपेठेतील मुख्य गांधी चौकात काही दिवसांपूर्वी लिंबू, हळद, टाचण्या, नारळ, पिंजर अशा अघोरी आणि करणीसदृश वस्तू सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी बांदा पोलिस निरीक्षक मा. गजेंद्र पालये यांची भेट घेऊन सखोल चौकशीची मागणी केली आहे.
यापूर्वी या प्रकरणाबाबत माहिती दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर विजय चौकेकर यांनी फोनवरून प्राथमिक चर्चा करून प्रत्यक्ष बांदा पोलीस ठाणे गाठले. यावेळी त्यांनी पोलिस निरीक्षकांना महाराष्ट्र जादूटोणा आणि अघोरी कृत्यांपासून संरक्षण आणि प्रतिबंध अधिनियम २०१३ या कायद्याची प्रतही सुपूर्द केली. चौकेकर यांनी निवेदनात नमूद केलं आहे की, “अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीने जर अघोरी प्रकार घडवून आणले, लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले, तर त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे.”
*पोलिस पाटील यांच्यासाठी कार्यशाळेची मागणी*
या भेटीत चौकेकर यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण मागणी पोलिस निरीक्षकांकडे ठेवली की, “बांदा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलिस पाटलांसाठी जादूटोणा विरोधी कायद्यावर प्रात्यक्षिकांसह सखोल कार्यशाळा घेण्यात यावी.”यामुळे पोलिस पाटील स्वतः कायद्याची माहिती घेऊन आपल्या गावात जर या कायद्यातील अनुसूची १२ अंतर्गत काही घटना घडत असतील, तर त्याची तत्काळ माहिती पोलिसांना देतील आणि वेळेवर प्रतिबंधात्मक कारवाई करता येईल, असे चौकेकर यांनी सांगितले.
*पोलिस प्रशासनाकडून आश्वासन*
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पोलीस निरीक्षक गजेंद्र पालये यांनी, “चतुर्थी नंतर पोलिस पाटील यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल,” असे स्पष्ट केले. तसेच गांधी चौकात सापडलेल्या वस्तूंबाबत सखोल चौकशी करून, ज्यांनी त्या वस्तू ठेवल्या त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

