खारेपाटण ग्रामपंचायती च्या वतीने “क्लीन मास्टर क्लिनिग” सेवेचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा संपन्न..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴खारेपाटण,दि.११: कणकवली तालुक्यातील अतिशय महत्वाचे गाव असलेल्या तथा शहरिकरनाकडे वाटचाल करणाऱ्या खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने येथील नागरिकांच्या आरोग्याच्या सेवेच्या दृष्टीने शौचालय टाकीचे अत्याधुनिक मशिनद्वारे साफसफाई करून देणाऱ्या “क्लीन मास्टर क्लिनिग” सेवेचा शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रमाचा सोहळा नुकताच खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
या कार्यक्रमाला क्लीन मास्टर सेवेचे प्रमुख प्रा.आशिष नाईक, खारेपाटण उपसरपंच इस्माईल मुकादम,सामाजिक कार्यकर्ते महेश कोळसुलकर,खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे,प्रा.वसीम सय्यद,गिरीश पाटणकर,रवी चव्हाण आदि उपस्थित होते.
खारेपाटण बस स्थानक येथे आज “टॉयलेट टॅंक,वॉटर टॅंक क्लिनिग व्हॅनच्या जनसेवेचा शुभारंभ करण्यात आला. प्रा.आशिष नाईक व खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या सौजन्य व प्रयत्नातून खारेपाटण येथील जनतेच्या सेवेसाठी अगदी वाजवी दरात सौचालयाच्या टाकी ग्रामपंचायतच्या माध्यमातून साफ करून देण्यात येणार आहे. विशेष करून ग्रामीण भागातील जनतेला याचा फायदा होणार आहे.तरी नागरिकांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी केले आहे.
_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_
💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..
_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻♂️*_
*💁🏻♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

