🛑 सातार्डा येथे पंचक्रोशी मर्यादित खुली एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न
🛑 एकपात्री अभिनय स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर
🎴सावंतवाडी, दि-२७:- सातार्डा टिळक ग्रंथालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुष्प अकरावे अंतर्गत पंचक्रोशी मर्यादित खुली एकपात्री अभिनय स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालय आयोजित व परशुराम सावळाराम शिरोडकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव उदय शिरोडकर पुरस्कृत पंचक्रोशी मर्यादित, “एकपात्री अभिनय” स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी, मुंबई महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका स्नेहल नंदकिशोर मांजरेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून ,सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने आतापर्यंत राबविलेले सर्व उपक्रम हे स्तुत्य आहेत ,तसेच त्यांच्या कार्याचा गौरव करत ,आयोजकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन कवठणी गावचे सामाजिक कार्यकर्ते, रंगकर्मी सदानंद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थितांचे स्वागत करून , दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी ,व्यासपीठावर ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर, कार्यवाह धनंजय केरकर, सहकार्यवाह ज्ञानदीप राऊळ, सल्लागार नारायण बागकर, गजानन शिरसाट , ग्रामपंचायत सदस्या शर्मिला मांजरेकर, सदस्य गोविंद मांजरेकर पंचायत समिती माजी सदस्या श्रुतिका बागकर, परीक्षक प्रसाद मांजरेकर, रुपेश कवठणकर, मुख्याध्यापक दासू गावित, सातार्डा पोलीस पाटील विनिता मयेकर, सातोसे पोलीस पाटील संदीप सातार्डेकर, उद्योजक संतोष कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते.
संतोष कांबळी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, ग्रंथालयाच्या आयोजित कार्यक्रमांचे कौतुक केले. यावेळी पांडुरंग हळदणकर, आनंद तानावडे, दीपक मांजरेकर ,बाबी मेस्त्री, संदेश कवठणकर ,ओंकार कवठणकर , सदू सातार्डेकर, सावळाराम शिरोडकर ,परशुराम मांजरेकर, प्रभाकर मांजरेकर, श्रीधर बागकर,गणेश मांजरेकर, शुभम पिळणकर,नंदकिशोर मांजरेकर ,समिधा मांजरेकर, नेहा मांजरेकर, शंकर पारिपत्ये, चंद्रशेखर प्रभू,सातार्डा हायस्कूल मुख्याध्यापक प्रशांत सावंत, ऋतुजा पारिपत्ये मेघश्याम बागकर ,संतोष पाटकर, उमेश मांजरेकर , ग्रंथपाल संजय कवठणकर , उत्कर्षा आरोंदेकर ,रवींद्र कवठणकर स्नेहल बागकर ,गणेश कुंदे, उदय आरोंदेकर, नितीन आरोंदेकर, अमित कुडतरकर शर्वरी जाधव , कला कवठणकर, नम्रता कळंगुटकर, प्रकाश कांबळी तुळशीदास मयेकर, अमेय सातार्डेकर ,गणेश घाडी सुधाकांत जाधव ,श्याम बागकर , मनीषा गवंडी, स्पर्धक विद्यार्थी , शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिळक ग्रंथालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त “पुष्प अकरावे” अंतर्गत पंचक्रोशी मर्यादित खुली एकपात्री अभिनय स्पर्धा घेण्यात आली. सर्वच स्पर्धकांनी एकापेक्षा एक असा एकपात्री अभिनय करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे- बालगट( तिसरी ते चौथी)- प्रथम पवित्रा अमित कुडतरकर ,द्वितीय लावण्या महेश कुबल, तृतीय प्रियांश समीर म्हालदार,
लहान गट (पाचवी ते सातवी) – प्रथम ओवी उदय आरोंदेकर , द्वितीय आर्या नितीन आरोंदेकर, तृतीय दिया अमेय सातार्डेकर,
मोठा गट (आठवी ते दहावी) – प्रथम आर्या संदेश कवठणकर, द्वितीय आर्या महेंद्र वेंगुर्लेकर, तृतीय पलक संतोष कवठणकर यांनी यश संपादन केले.सर्व यशस्वी स्पर्धकांचे उपस्थितांकडूनअभिनंदन करण्यात आले.
प्रास्ताविक ग्रंथालयाचे अध्यक्ष, ज्ञानेश्वर मांजरेकर यांनी केले.
स्पर्धेचे परिक्षक प्रसाद मांजरेकर व रुपेश कवठणकर यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार कार्यवाह धनंजय केरकर यांनी केले.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

