करियरक्रीडाराजकीयवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

म्हापण-खवणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत “स्वराज्य इलेव्हण आंदुर्ले” संघ ठरला अंतिम विजेता..

▪️कराड येथे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कै. निलेश मोंडकरला श्रद्धांजली अर्पण करून केली अंतीम सामन्याला सुरुवात..

▪️शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला बक्षीस वितरण सोहळा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ले,दि.१०: तालुक्यातील म्हापण-खवणे मित्र मंडळ आयोजीत  म्हापण-खवणे प्रीमियर लीग २०२१ क्रिकेट स्पर्धा आज मळई येथे संपन्न झाली. अंतिम सामन्यात स्वराज्य ईलेवण आंदूर्ले संघाने मनीष-अतुल फायटर या संघावर मात करत म्हापण पंचक्रोशीत पार पडलेल्या पहिल्या वहिल्या ओवरआर्म क्रिकेट प्रीमियर लीग चा विजेता होण्याचा बहुमान पटकावला.

तत्पूर्वी रविवारी कराड येथे झालेल्या भीषण अपघातात प्राण गमावलेल्या खवणे गावचा युवक  कै. निलेश मोंडकर याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अंतिम सामन्याला सुरूवात करण्यात आली. निलेश हा दर्यारजा खवणे मंडळाचा धडाडीचा कार्यकर्ता होता.

स्पर्धेतील उत्कृष्ठ फलंदाज भावेश मेतर तर उत्कृष्ठ गोलंदाज हा सन्मान जयदेव केळुसकर याने प्राप्त केला. मालिकेतील उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक पुंडलिक पराडकर व उत्कृष्ठ यष्टिरक्षक म्हणून साईराज मोरजकर याची निवड करण्यात आली. आदर्श खेळाडू ची माळ अजय हंजणकर याच्या गळ्यात घालण्यात आली. मालिकावीराचा बहुमान अनिकेत वाईंगणकर याने आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत पटकावला तर मालिकेतील आदर्श संघ म्हणून अभिनव ब्रदर्स या संघाची निवड करण्यात आली.

शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. पंचक्रोशीतून गुणवान खेळाडू निर्माण होवून राष्ट्रीय पातळीवर त्यांनी आपल्या गावाची ख्याती कीर्ती निर्माण करावी असे आवाहन त्यांनी उपस्थित युवा खेळाडूंना केले. तसेच कै. निलेश मोंडकर याला श्रद्धांजली अर्पण करत मोंडकर कुटुंबीयांच्या  दुःखात आपण सहभागी असून मोंडकर कुटुंबीयांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

आयोजकांच्या वतीने सर्व मान्यवरांचे, पुरस्कर्त्यांचे व देणगीदारांचे आभार मानण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर माजी पंचायत समिती सदस्य पुरूषोत्तम परब, म्हापण विद्यमान उपसरपंच अशोक पाटकर, म्हापण माजी सरपंच गुरुनाथ मडवळ,  म्हापण ग्रा. पं. सदस्य संजोग परब व संदीप खोत, राज्य परिवहन महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर कांबळी, भाऊ तळावडेकर, अविनाश खोत, सुरेश ठाकुर इ. मान्यवर उपस्थित होते.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!