कणकवलीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण व कौटुंबिक स्नेहमेळावा संपन्न..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.१०: पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेला पुरस्कार वितरण सोहळा व कौटुबिक स्नेहमेळावा कौतुकास्पद आहे. राज्यातील आदर्श पत्रकार समितीचा पुरस्कार मिळावा, असे हे उल्लेखनिय काम कणकवली पत्रकार संघातर्फे सुरु आहे, असे कौतुकोद्गार मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी काढले. कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण व कौटुंबिक स्नेहमेळावा पिसेकामते येथील मैत्री रिसॉर्ट येथे पार पडला.

यावेळी व्यासपिठावर नाईक यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार माधवराव कदम, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, तहसीलदार आर.जे. पवार, खजिनदार अॅड. संतोष सावंत, सचिव उमेश तोरोसकर, सहाय्यक निरीक्षक सागर खांडागळे, ज्येष्ठ पत्रकार रमेश जोगळे, संतोष वायंगणकर, अशोक करवेळकर, महेश सरनाईक, सहाय्यक उपनिरीक्षक बापू खरात, कणकवली पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, खजिनदार माणिक सावंत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुधीर राणे, संतोष राऊळ आदी उपस्थित होते.

यावेळी दै. तरूण भारतचे उपसंपादक वीरेंद्र चिंदरकर यांना शशी तायशेटे स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच गणपत उर्फ भाई चव्हाण यांना बाळशास्त्री जांभेकर स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार, कुमार नाइकर्णी यांना अनिल सावंत स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार, संजोग सावंत यांना छायाचित्रकार पुरस्कार, रफीक नाईक यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार, प्रशांत सावंत यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, विठ्ठल देसाई यांना सहकार कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात आले. तर कोरोना महामारीत उत्कृष्ट काम करणारे कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. सतीश टाक, डॉ. श्रीराम चौगुले, परिचारिका नुपूर पवार, नयना मुसळे, खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया बडांग, आशा सेविका श्रद्धा गावडे, महसूल मंडळ अधिकारी संतोष नागावकर, नगरपंचायत कर्मचारी प्रविण गायकवाड आदी कोरोना योध्यांना गौरविण्यात आले.

गजानन नाईक म्हणाले, महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग हा खऱ्या अर्थाने सुसंस्कृत पत्रकारांचा जिल्हा आहे. म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाला नुकतेच महाराष्ट्रात गौरविले गेले. आताही कणकवली पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेला पुरस्कार वितरण सोहळा व स्नेहमेळावा कौतुकास्पद आहे. मुळे पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांमध्ये एकीची भावना वाढीस लागते. कणकवली पत्रकार समितीला राज्यातील आदर्श पत्रकार समितीचा पुरस्कार मिळावा, असे हे उल्लेखनिय काम आहे. साहजिकच त्याचे अनुकरण राज्यभरातील पत्रकार संघटनांनी करावे. आज पत्रकारांसमोर अनेक प्रश्न आहेत. अर्थात ते सोडविण्यासाठी राज्यस्तरावर आम्ही प्रयत्नशील आहोतच. पण, यासाठी सर्व पत्रकार बांधवांची साथ असणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग ही आयपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मभूमी आहे. त्यांचे जिल्ल्यात यथोचित स्मारक व्हावे, यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. तर पत्रकारांना व त्यात ग्रामीण पत्रकारांनाही अधिस्विकृतीचा लाभ मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे नाईक म्हणाले.

दरम्यान राज्यात चांगले काम करणाऱ्या तालुकास्तरीय पत्रकार समितीचा दरवर्षी गौरव केला जातो. काही तांत्रिक कारणास्तरव कणकवली पत्रकार समितीला आम्ही गौरवू शकलो नाही. मात्र, या समितीचे कौतुक करण्यासाठीच मी स्वत: उपस्थित राहिल्याचेही नाईक म्हणाले.

माधवराव कदम म्हणाले , कणकवली पत्रकार समितीने गतवर्षी प्रजसत्ताकदिनी न भूतो ‘ असा स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम केला . त्याचीच पुनरावृत्ती यावर्षीही करून दाखविली . पत्रकार समितीची ही आदर्शवत कामगिरी आहे . वास्तविक दैनंदिन बातम्यांच्या शेड्युल मध्ये ‘ बिझी असतानाही कणकवली तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र येत असा अनोख्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करून सर्व पत्रकारांसमोर आदर्श घालून दिला आहे .

गणेश जेठे म्हणाले, स्नेहसंमेलनासारख्या कार्यक्रमांमुळे समाजामध्ये एकजुट निर्माण होते . अशा कायक्रमांमुळे वैचारिक देवाणघेवाण होतेच . शिवाय आपसातील ऋणानुबंधही अधिकाधिक घट्ट होतात.साहजिकद कणकवली पत्रकार समितीतर्फे आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम नक्कीच उल्लेखनिय आहे . असे कार्यक्रम पत्रकार संघटनांतर्फे सातत्याने व्हायला हवेत , असे जेठे म्हणाले . आर . जे . पवार म्हणाले , कणकवली पत्रकार समितीच्या पुरस्कार वितरण व स्नेहमेळाव्याला उपस्थित राहू शकलो , हे माझे भाग्य आहे . विशेषत : कणकवली तालुक्यात अधिकारी व पत्रकार यांच्यात चांगले संबंध आहेत . एकीकडे सरकारी कामातील चुका दाखविताना चांगल्या कामालाही तालुक्यातील पत्रकार तितकाच पाठींबा देतात . आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून पत्रकारांच्या कुटुंबियांनाही भेटता आले . याचाही आनंद आहे . प्रास्ताविकात भगवान लोके यांनी कणकवली पत्रकार समितीच्या दोन वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला . कणकवली पत्रकार समितीतर्फे गत दोन वर्षात वनराई बंधारे , कौटुंबिक स्नेहमेळाथे , पुरस्कार वितरण , कोरोना काळात उल्लेखनिय काम करणाऱ्या योख्यांचा गौरव असे अनेक उपक्रम राबविले. तसेच टोलमाफी व विविध प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना ४० हून अधिक निवेदने दिल्याचे लोके यांनी सांगितले. पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर दुपारच्या सत्रात पुरुषांसाठी संगितखुर्ची तर महिलांसाठी होम मिनिस्टर असे कार्यक्रम रंगले होते. पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. आभार कणकवली पत्रकार समितीचे माजी अध्यक्ष अजित सावंत यांनी मानले.

_*🚗इन्शुरन्स काढायचा आहे.. “Don’t Worry”*_

*🌈आता आपल्या गाडीचा इन्शुरन्स काढा अगदी आपल्या खिशाला परवडेल अशा पैशात..🚗*

*🛵आमच्याकडे सर्व गाड्यांचे फुल इन्शुरन्स,थर्ड पार्टी इन्शुरन्स काढून मिळतील..*

*🚗तुमच्या खिशाला परवडतील अशा विविध रक्कमेच्या इन्शुरन्स पाँलिसी उपलब्ध..*

_*🤷🏻‍♂️ संपर्क : विशाल पित्रे, सावंतवाडी*_
_*📱मोबाईल : 9405475712*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!