रत्नागिरीराजकीयशासकीय

चिपळूण महाविकास आघाडी नगरसेवकांनी घेतली डीवायएसपी डॉ.सचिन बारी यांची सदिच्छा भेट..

▪️पोलीस व न.प. शहरातील पार्किंग व अतिक्रमण याबाबत करणार ॲक्शन प्लॅन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.१०: नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सुधीर शेठ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी बुधवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी नव्याने पदभार स्विकारलेले पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन बारी यांची सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी बांधकाम सभापती मनोज शिंदे, शिक्षण सभापती सफा गोटे,नगरसेविका सई चव्हाण, सीमा रानडे, सुषमा कासेकर, संजीवनी शिगवण, संजीवनी घेवडेकर,फैरोजा मोडक,सुरैय्या फकीर,जयश्री चितळे तसेच माजी उपनगराध्यक्ष महंमद फकीर उपस्थित होते .यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सचिन बारी यांनी चिपळूण शहरांमध्ये असणारे अतिक्रमण आणि पार्किंग समस्या याबाबत नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरात लवकर ॲक्शन प्लॅन तयार करून ही समस्या निकालात काढण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करावे असे सांगितले.तसेच धूम स्टाईलने  ,सायलेन्सर काढून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी धारकांची माहिती
देखील पोलिसांना देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पोलीस प्रशासनाचे एक पत्र नगरपालिकेत द्यावे. यानंतर  नगरपालिकेत याबाबत बैठक आयोजित करून यावर कशा पद्धतीने उपाययोजना करता येतील याचे नियोजन करू असे सुधीरशेठ शिंदे यांनी सांगितले. यावेळी डॉ बारी यांनी चिपळूण शहराच्या सुरक्षिततेच्या बाबत सदैव सहकार्य राहील असे आश्वासन देखील उपस्थितांना दिले.

_*🚗इन्शुरन्स काढायचा आहे.. “Don’t Worry”*_

*🌈आता आपल्या गाडीचा इन्शुरन्स काढा अगदी आपल्या खिशाला परवडेल अशा पैशात..🚗*

*🛵आमच्याकडे सर्व गाड्यांचे फुल इन्शुरन्स,थर्ड पार्टी इन्शुरन्स काढून मिळतील..*

*🚗तुमच्या खिशाला परवडतील अशा विविध रक्कमेच्या इन्शुरन्स पाँलिसी उपलब्ध..*

_*🤷🏻‍♂️ संपर्क : विशाल पित्रे, सावंतवाडी*_
_*📱मोबाईल : 9405475712*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!