आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

वाफोलीत ‘जॅक कॉफी’चं सादरीकरण

🛑 फणस बियांपासून तयार झालं आरोग्यदायी व उत्पन्नवर्धक पेय..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-१५:- दुय्यम मानल्या जाणाऱ्या फणस बियांना नवजीवन देत आणि त्यातून आरोग्यदायी पेय निर्माण करत,डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील विद्यार्थ्यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला.‘जॅक कॉफी’ या आरोग्यवर्धक पेयाचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक वाफोली गावात श्री.विलास गावस व त्यांच्या पत्नी सौ.धनश्री गवस यांच्या चालणाऱ्या गृह लघुउद्योगाच्या ठिकाणी करण्यात आले.
या प्रात्यक्षिकात विद्यार्थ्यांनी फणसाच्या बियांपासून कॉफी तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया सविस्तर समजावून सांगितली.या ‘जॅक कॉफी’चे अनेक फायदे उपस्थित शेतकऱ्यांना सांगण्यात आले – डायबेटिससाठी उपयुक्त,पचन सुधारक,शरीराला उर्जा देणारी आणि पूर्णतः नैसर्गिक. यासोबतच ही कल्पना शून्य कचरा संकल्पनेशी सुसंगत असून, पर्यावरणपूरक आहे.
या उपक्रमामुळे फणस बियांना आर्थिक मूल्य प्राप्त होत असून,त्या विकून शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचं साधन निर्माण होऊ शकतं. गावपातळीवर या प्रकारचे प्रयोग पुढे राबवले गेले,तर स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकते.
या नाविन्यपूर्ण उपक्रमात पुढील विद्यार्थ्यांचा सहभाग होता –
आर्य मोरजकर, प्रज्वल उगवेकर, संतोष घेरडे, वैष्णव जगदाळे, राज नाईक,अथर्व देवळेकर आणि यश वाघ.
या युवा विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे तर सामाजिक भान, सर्जनशीलता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाचाही मार्ग दाखवला आहे.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!