रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते उद्योजक डॉ.विनोदराव मोरेंची निवड..
▪️सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या डॉ.विनोदराव मोरेंच्या कार्याचा गौरव..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.१०: रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी महाड येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक डॉ.विनोदराव मोरे यांची नुकतीच मुंबईतील कार्यक्रमात नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर माजी मंत्री तसेच खासदार सुनील तटकरे यांनी महाड येथील मोरे यांच्या फौउंटन इन हॉटेलमध्ये भेट दिली असता यावेळी महाड तालुक्यातील प्रातिनिधिक स्वरूपात १०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खासदार सुनील तटकरे यांनी या सर्वांचे स्वागत करून डॉ. विनोदराव मोरेंच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची हमी दिली. तसेच डॉ.विनोदराव मोरेंच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. सदरचा कार्यक्रम खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विनोदराव मोरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निलेश महाडिक, अल्पसंखांक्य समाजाचे मुस्लिम नेते महंमद मुजावर, आयज खान, तसेच मोरेंचे कौटुंबिक मित्र मर्चंट नेव्ही ऑफिसर इम्रान कोंडकरी, मथुरा उत्तर प्रदेश मधील उद्योजक श्री. शर्मा, श्री. खान यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी खासदार सुनील तटकरे यांना मर्चंट नेव्ही ऑफिसर इम्रान कोंडकरी यांचा परिचय मोरेंनी करून दिला असता कोंडकरी हे नोकरी बजावत असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. तसेच इम्रान कोंडकरी हे तरुणांना शिक्षण व नोकरीबाबत करत असलेल्या मार्गदर्शनाबाबत अभिनंदन करून काहीही मदत लागल्यास करण्याचे आश्वासन श्री. तटकरे यांनी दिले.
डॉ.विनोदराव मोरेंची उल्लेखनीय सामाजिक बांधिलकी
डॉ.विनोदराव मोरे यांचे सामाजिक क्षेत्रात फार मोठे योगदान असून ज्यावेळी सावित्री पुलाची दुर्घटना घडली त्यावेळी एनडीआरएफ टीमच्या जवानांसह तब्बल १६०० लोकांची २२ दिवस स्वतःच्या फाउंटन इन हॉटेल मध्ये मोफत सर्व व्यवस्था केली. तसेच पोलादपूर तालुक्यातील तुटवली ते निवे ह्या गावांमधील १५ किलोमीटर रस्ता स्वखर्चाने करून दिला. जमीन सपाटीपासून २२०० फूट उंचीवर रस्ता करून दिला. यामुळे परिसरातील संपर्क तुटलेली ५० गावे संपर्कात आली. डॉ.मोरे यांची स्वर्गीय आई शेवंतीबाई मोरे यांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या राष्ट्रीय स्तरावर कामगिरी करत असलेल्या आई फाऊंडेशनच्या माध्यमातून ९५ मुलांना दत्तक घेतले असून त्यांची सर्व देखभाल डॉ.विनोदराव मोरेंच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. अशाप्रकारे मोरे यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असून त्याबद्दल त्यांना अनेकदा राज्यस्तरीय-राष्ट्रीय स्तरावर पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
*🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_
_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_
_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

