कोकणरत्नागिरीराजकीयशासकीयसामाजिक

उपनगराध्यक्ष सुधीरशेठ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नगरसेवकांकडून साने गुरुजी उद्यानाची पाहणी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.१०: शहरातील मध्यवर्ती चिंचनाका येथील साने गुरुजी उद्यान याचे नुतनीकरणाचे कामकाज सध्या सुरू आहे. बुधवार दिनांक १० फेब्रुवारी २०२१ रोजी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सुधीरशेठ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी सानेगुरुजी उद्यानाचे चालू असलेल्या कामकाजाची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत बांधकाम सभापती मनोज शिंदे, फैरोझा मोडक, सुषमा कासेकर, सई चव्हाण, सीमा रानडे, सुरैय्या फकीर, संजीवनी घेवडेकर, संजीवनी शिगवण, शिक्षण सभापती सफा गोटे, जयश्री चितळे, तसेच माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद फकीर आदी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी उद्यानातील झालेल्या कामाची माहिती नगरपालिकेतील विभाग प्रमुख बापु साडविलकर यांच्याकडून घेतली आणि कामाचा दर्जा चांगला राखला जावा याबाबत काही सूचना देखील केल्या. हे उद्यान येत्या काही दिवसातच चिपळूण वासियांसाठी खुले होईल अशी माहिती यावेळी देण्यात आली.

सदर उद्यानाच्या नुतनीकरणासाठी औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांनी सीएसआर फंडातून मदत केल्याबद्दल त्यांचे देखील आभार सर्व मान्यवरांनी व्यक्त केले.

*_🔥आम्ही आपल्याला देऊ बारा लाखात घर..🔥_*

⚡आपल्याला हक्काचे घर🏠 हवे आहे? आपण घराच्या🏡 शोधात आहात? आपल्याकडे जमवलेली पुंजी💰 कमी पडत आहे? निराश होऊ नका!😊

*💫सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर आम्ही आपल्या देऊ बारा लाखात साडे पाचशे स्क्वेअर फुट सदनिका, तसेच सावंतवाडी शहरात व शहराच्या आसपास एन ए प्लॉट उपलब्ध..🤝*

🙅🏻‍♂️कोणतीही कायदेशीर कटकट नाही. सगळे व्यवहार पारदर्शी!💥

*😊व्यवहार पूर्ण होईपर्यंत व ताबा मिळेपर्यंत आम्ही देणार आहोत सर्व प्रकारची मदत..🙌*

💫चला तर मग! आपले स्वप्न सत्यात उतरवा..⚡

_*🤷🏻‍♂️संपर्क : सीताराम गावडे*_
_*संपादक कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल,*_
न्यू सबनिसवाडा, बिरोडकरटेंब, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
_*🙋🏻‍♂️मोबाईल ⬇️*_
_*📱8484827993*_
_*📱9423304856*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!