आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑 पालकमंत्री नितेश राणे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन साटेली-भेडशीतील युवकांचा भाजपमध्ये प्रवेश..

🛑 हिंदुत्व, विकास आणि युवकांच्या हितासाठी कार्याचा निर्धार..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-०९:- साटेली-भेडशी येथील अनेक युवकांनी भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर व भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील विकासकामे व त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेने प्रेरित होऊन भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे या युवकांनी स्पष्ट केले.

यामध्ये शिंदे शिवसेनेचे गणपत डिंगणेकर यांचे खंदे समर्थक समजले जाणारे निलेश धर्णे यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नितेश राणे यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीमुळे आपण निर्णय घेतल्याचे धर्णे यांनी सांगितले.

प्रवेश करताना युवकांनी म्हटले, “आम्ही पक्षासाठी निष्ठेने काम करू. हिंदुत्व, विकास आणि युवकांच्या प्रगतीसाठी आमचे योगदान देऊ. गावागावात भाजपची विचारधारा पोहोचवणार आहोत.” यावेळी प्रवेशकर्त्यांमध्ये निलेश धर्णे, कल्पेश धर्णे, अरविंद धर्णे, संजय आरोस्कर, कलैय्या हिरेमठ, राज तांबे, संजय नाईक, मंथन डिंगणेकर, नारायण धर्णे, आदित्य मयेकर, राजेंद्र गवस, रोहित धर्णे, विक्रम धर्णे, गंगाराम मेस्त्री, लक्ष्मण सुतार, अनंद नाईक संग्राम धर्णे आदींचा समावेश आहे.

पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, तसेच भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी यांचे मार्गदर्शन वेळो वेळी घेऊन, त्यांच्या नेतृत्वाखाली साटेली-भेडशी परिसरात पक्ष बळकट करण्याचा संकल्प या युवकांनी केला असल्याचे सांगितले आहे.

यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजप सरचिटणीस महेश सारंग, भाजप चे ज्येष्ठ पदाधिकारी विजय कुमार मराठे रमेश दळवी,भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस ,नगराध्यक्ष चेतन चव्हाण ,माजी तालुका प्रमुख सुधीर दळवी ,चंद्रू मळीक यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!