कोलगांव ब्राह्मण मंडळाचा स्तुत्य उपक्रम
सावंतवाडी, दि. ०७:- तालुक्यातील कोलगांव ब्राह्मण मंडळाने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे, अनेक वर्षे कोलगांव ब्राह्मण मंडळ हे मंडळातील सदस्यांना वाढदिवसानिमित्ताने गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देत असत मात्र ह्या संकल्पनेत बदल करुन आता मंडळातील सदस्यांना गुलाबपुष्प न देता फुलझाड देण्यास सुरुवात केली आहे.
शुभेच्छापर दिलेल गुलाबपुष्प हे जास्तीत जास्त दोन ते चार दिवस टिकू शकत मात्र शुभेच्छापर दिलेलं फुलझाड हे कायम आठवणीत राहील ह्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. रविवारी झालेल्या मासिक सभेत फुलझाडे वाटप करण्यात आले. ह्या केलेल्या उपक्रमाने कोलगांव ब्राह्मण मंडळाने एक वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.

