आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🛑 बुडके कुटुंबियांकडून साटेली केंद्रशाळेला माईक व स्पीकर भेट

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२८:- साटेली- भेडशी केंद्रशाळेसाठी इयत्ता चौथीत शिकणारी विद्यार्थिनी अन्वी बुडके हिचे पालक (आईवडील)
नारायण बाळकृष्ण बुडके व श्रद्धा नारायण बुडके यांनी १४,५०० रुपये किमतीचा माईक व स्पीकरचा संच भेट दिला.यावेळी अन्वीचे काका गोपाळ बुडके, आजोबा बाळकृष्ण नारायण बुडके व आजी राधिका बाळकृष्ण बुडके उपस्थित होते.
साटेली भेडशी ही तालुक्यातील सर्वात मोठी आणि उपक्रमशील शाळा आहे. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून शाळेची गुणवत्ता वाखाणण्याजोगी आहे.या शाळेचे विद्यार्थी वेगवेगळ्या उपक्रम व स्पर्धा परीक्षांमध्ये तालुका व जिल्हास्तरावर उज्ज्वल यश संपादन करतात.या शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने शाळेची पटसंख्याही तालुक्यात सर्वाधिक आहे.साहजिकच अनेक शिक्षणप्रेमी व पालक शैक्षणिक उठावाच्या माध्यमातून अनेक वस्तू शाळेला भेट देतात.जर्मन येथील पर्यटकही दरवर्षी या शाळेला भेट देऊन शाळेचा परिपाठ, माध्यान्ह भोजन यात सहभागी होतात आणि विद्यार्थ्यांना उपयोगी ठरतील अशा वस्तू भेट देतात .त्यांनीही शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचे नेहमीच कौतुक केले आहे.मुख्याध्यापक पूनम पालव आणि सर्व शिक्षकवर्ग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विशेष मेहनत घेतात. अन्वी बुडके यांच्या पालकांनी माईक व स्पीकरचा संच भेट दिला तेव्हा पदवीधर शिक्षक दीपक दळवी, संपदा दळवी, मिलन पाटील, सीमा नाईक,नूतन शिंदे आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी बुडके कुटुंबीयांचे पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले, तर शिक्षकांनी शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानले.
साटेली भेडशी: केंद्रशाळेला माईक व स्पीकर भेट देणारे बुडके कुटुंबीय.बाजूला शिक्षक व अन्वी बुडके.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!