महिलांसाठी मोफत गोड्या पाण्यातील माशांचे पासून विविध पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण

*▪️भाजपा महिला मोर्चा च्या वतीने व सिंधु आत्मनिर्भर एसअभियान व निलक्रांती क्रुषी व मस्त्यपर्यटन सह.संस्थेच्या सहकार्याने वेंगुर्लेत महीलांसाठी मोफत गोड्या पाण्यातील माशांपासुन विविध खाद्यपदार्थं*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*समीर चव्हाण*

*🎴 वेंगुर्ला:*
भाजपाचे सिंधु आत्मनिर्भर अभियान व निलक्रांती क्रुषी व मस्त्यपर्यटन सह.संस्थेच्या वतीने दिनांक १२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान सावंतवाडीत जनरल जगंन्नाथराव भोसले शिव ऊद्यान येथे *मस्त्य मोहस्तवाचे* आयोजन केले आहे . या मस्त्य मोहस्तवाच्या निमित्ताने गोड्या पाण्यातील माशांचे प्रदर्शन , मस्त्य खाद्य जत्रा ,शोभिवंत माशांचे प्रदर्शन व विक्री , प्रधानमंत्री मस्त्य संपदा योजनेची माहिती, जिवंत मस्त्य विक्री केंद्र , मस्त्य व्यवसाय मार्गदर्शन , मस्त्य पाककला स्पर्धा इत्यादीचे आयोजन केले आहे .
या मस्त्य मोहस्तवामध्ये गोड्या पाण्यातील माशांची ओळख व्हावी व त्या गोड्या पाण्यातील माशांची चव चाखता यावी यासाठी महिलांसाठी खास गोड्या पाण्यातील माशांपासुन विविध *खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण* *वेंगुर्ले येथील साईमंगल कार्यालय येथे शुक्रवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ = ३० ते १ = ००* या कालावधीत आयोजित केले आहे . सदर प्रशिक्षण हे मस्त्य महाविद्यालय शिरगाव , जिल्हा – रत्नागिरी या मस्त्य विद्यालयाचे डाॅ. आशिष मोहीते , डाॅ.डाबीर पठाण व प्रोफेसर एस्. टी.सारंगधर हे प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत . या प्रशिक्षण शिबिरामध्ये गोड्या पाण्यातील माशांपासुन कटलेट , कोळंबी लोणचे , फीश क्रीस्पी , फीश बाॅल्स् व विविध खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे .
भाजपा महिला मोर्चा महिलांना आत्मनिर्भर बनविण्याकरीता यापूर्वीही विविध उपक्रम हाती घेतले आहेत . जिल्ह्यातील महिला बचत गटांना सेलम जातीचे हळदीचे १५ हजार कीलोचे बियाणे वाटप केले , तसेच मोफत खतही वितरीत करण्यात आले . तसेच महीलाभगिनींना माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या मार्फत शिलाई मशीन व सायकल देण्यात आल्या .
या पाककला प्रशिक्षण शिबिराचा वेंगुर्ले तालुक्यातील महीलांनी सहभागी होऊन आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा स्मिता दामले , जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर , महिला ता.सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर , महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर यांनी केले आहे .

_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

*🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_

_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_

_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!