*सावंतवाडी : येथे मल्लसम्राट प्रतिष्ठानचा वर्धापन दिन साजरा झाला*
*मान्यवरांच्या उपस्थितीत मल्लसम्राट प्रतिष्ठान ची टीम*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*प्रशांत मोरजकर*
*🎴 सावंतवाडी :*
सावंतवाडी, : कुस्ती सिंधुदुर्गात तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम मल्लसम्राट प्रतिष्ठान करीत आहे. आणि या संघटनेतून नक्कीच उद्याचे महाराष्ट्र केसरी जिंकणारे पैलवान निर्माण होतील असा विश्वास आज येथे पानवळ कॉलेजचे प्राध्यापक शरद शिरोडकर यांनी व्यक्त केला. मल्लसम्राट प्रतिष्ठान, सावंतवाडीचा वर्धापन दिन येथे आज साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटनेचे सचिव दाजी रेडकर, श्री खान, प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू जावेद शेख, सचिव ललित हरमलकर, कुस्तीपटू विशाल ठाकूर उपस्थित होते. श्रीदेव हनुमंताच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना शिरोडकर पुढे म्हणाले, कुस्ती खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला या खेळाचा इतिहास माहीत असायला हवा. या खेळाची खरी सुरुवात ग्रीक देशात झाली. सुरुवातीला माणूस प्राण्यांसोबत युद्ध खेळत असते त्यातूनच कालांतराने या खेळाचा जन्म झाला. कुस्ती खेळणारे खेळाडू मारुतीरायाची उपासना शक्ती आणि बुद्धीचाही देव म्हणून करतात. या कुस्तीच्या माध्यमातूनच आम्ही कोरोनावर तंदुरुस्त राहून मात केली आहे. कुस्तीचा खेळ खेळण्यासोबत या खेळाचा अभ्यासही आपण करायला हवा. या प्रतिष्ठान चे सदस्य कुस्तीला आज तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहेत हे खरोखरच कौतुकास्पद आहे. तुम्हाला लागेल ती मदत मी करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी श्री खान म्हणाले मल्लसम्राट प्रतिष्ठानच्या युवकाने कुस्तीचे या ठिकाणी बीज रोवले आहे. नक्कीच उद्याचे मैदान गाजविणारे खेळाडू निर्माण होतील. एकीकडे वाईट मार्गाकडे युवक वळत असताना मल्लसम्राट प्रतिष्ठानच्या माध्यमातून या सर्व युवकांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी श्री जावेद शेख म्हणाले, यापूर्वी आम्ही मॅटवरील कुस्तीच्या स्पर्धा घेतल्या होत्या. मात्र खर्या कुस्तीची सुरुवात मातीतून झाली आहे. त्यामुळे आम्ही यंदा जिल्हास्तरावरील मातीतील कुस्ती घेणार आहोत. कोरोनामुळे स्पर्धा व उपक्रम यापासून दूर होतो ;मात्र आता मल्लसम्राटच्या प्रतिष्ठान कडून विविध समाजोपयोगी उपक्रमही आता राबविण्यात येणार आहे.
यावेळी मल्लसम्राट प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष योगेश बेळगावकर, प्रसिद्धीप्रमुख भूषण आरोसकर, सदस्य नागेश सूर्यवंशी, चिंतामणी दळवी, बुधाजी हरमलकर, कृष्णा हरमलकर, योगेश रावल, दशरथ गौंडल्याळ, संकेत माळी, स्टीव्ह डॉन्ट्स, गणेश राऊळ, रत्नाकर माळी व इतर खेळाडू कुस्तीप्रेमी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण आरोसकर यांनी तर प्रास्ताविक आणि आभार ललित हरमलकर यांनी मानले.
_*🚗इन्शुरन्स काढायचा आहे.. “Don’t Worry”*_
*🌈आता आपल्या गाडीचा इन्शुरन्स काढा अगदी आपल्या खिशाला परवडेल अशा पैशात..🚗*
*🛵आमच्याकडे सर्व गाड्यांचे फुल इन्शुरन्स,थर्ड पार्टी इन्शुरन्स काढून मिळतील..*
*🚗तुमच्या खिशाला परवडतील अशा विविध रक्कमेच्या इन्शुरन्स पाँलिसी उपलब्ध..*
_*🤷🏻♂️ संपर्क : विशाल पित्रे, सावंतवाडी*_
_*📱मोबाईल : 9405475712*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_