लवकरात लवकर कुडाळ मधील वीजपुरवठा सुरळीत करा
◾आ.वैभव नाईक यांच्या महावितरण अधिकाऱ्यांना सूचना..*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
*✍️ प्रतिनिधी : गणेश तोडकर*
*🎴कुडाळ, दि-१८ :-* कुडाळ तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात आमदार वैभव नाईक यांनी महावितरण सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील, कुडाळचे कार्यकारी अभियंता श्री. लोकरे यांच्याशी चर्चा करत सद्यस्थितीचा आढावा घेतला. कुडाळ तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत पोल, वाहिन्या तुटून वीज पुरवठा खंडित झाला आहे. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना आ. वैभव नाईक यांनी यावेळी दिल्या आहेत.
तसेच मुख्य अभियंता (प्रकाशगड)श्री परदेसी, अधीक्षक अभियंता श्री. मुलाणी यांची देखील आ. वैभव नाईक यांनी कुडाळ येथे भेट घेऊन चर्चा केली. कमीत कमी वेळात जिल्ह्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.
कुडाळ आर.एस. एन. हॉटेल येथे मुंबई गोवा महामार्गावर लावलेले पथदीप गेले काही दिवस बंद आहेत. याबाबत नागरिकांच्या तक्रारीवरून आमदार वैभव नाईक यांनी हायवे ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करत उदयापर्यंत पथदीप सुरु करण्याच्या कडक शब्दात सूचना दिल्या आहेत.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, शहरप्रमुख संतोष शिरसाट, संजय भोगटे नगरसेवक सचिन काळप, शेखर गावडे, समद मुजावर, रुपेश पावसकर, राजू गवंडे, मंजूनाथ फडके,प्रसाद पोईपकर आदी उपस्थित होते.