कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कुडाळ येथे २३ रोजी ‘माझा लोकराजा’ महोत्सवाचे आयोजन.

*🛑कुडाळ येथे २३ रोजी ‘माझा लोकराजा’ महोत्सवाचे आयोजन.*

 

*🛑कुडाळ तालुका पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशिय संघटनेचे आयोजन.*

 

*🛑’रक्तपिपासू रक्ताक्षी’ नाट्यप्रयोगासहीत विविध कार्यक्रमांचे आयोजन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴कुडाळ, दि- २१:-* कुडाळ तालुका पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशिय संघटनेच्या वतीने सोमवार २३ जून रोजी ३.०० वाजता कुडाळ येथील श्री कुडाळेश्वर मंदिर येथे ‘माझा लोकराजा महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त कुडाळ तालुक्यातील दशावतार कलाकारांचा ‘रक्तपिपासू रक्ताक्षी’ नाट्यप्रयोगासोबत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कोकणची अस्मिता म्हणजे दशावतार लोककला ही लोकाश्रयामुळे जीवंत आहे. हिंदू संस्कृतीचे जतन करणारी कला म्हणजे दशावतार कला व कलाकार यांच्या जतन व संवर्धन या दृष्टीने स्थापन झालेल्या कुडाळ तालुका दशावतार कलाकार संघटनेच्यावतीने आयोजित ‘माझा लोकराजा’ महोत्सवाचे यंदाचे हे ३ रे वर्ष आहे. या महोत्सवानिमित्त सायंकाळी ३.०० वाजता उदघाटन समारंभ व जेष्ठ दशावतार कलाकारांचा सन्मान आदी कार्यक्रम होणार आहेत. यात सत्कारमूर्ती कै. महादेव लोट कुटुंबीय व कै. अशोक नेरूरकर कुटुंबीय तसेच प्रकाश आकेरकर, सुरेश धुरी व पंढरीनाथ सामंत आदी ज्येष्ठ दशावतारी कलाकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. सायंकाळी ४.०० वाजता इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व सायंकाळी ४.३० वाजता कुडाळ तालुक्यातील दशावतार कलाकारांचा ‘रक्तपिपासू रक्ताक्षी’ नाट्यप्रयोग होणार आहे. या नाट्यप्रयोगाची कथा संकल्पना अजित गाडगीळ यांची असून नाट्यप्रयोगात गणपती-राजा शिरपुटे, रिद्धी- दीपक राऊत, सिद्धी-बबन घोगळे, राम- विलास तेंडोलकर, शुक्राचार्य-मिलींद नाईक, हिरण्यम्-सुनील खोर्जुवेकर, नारद-पंढरीनाथ घाटकर, रक्ताशी बंड्या परब, विभीषण-बाबली नाईक, भरत-रोहण चव्हाण, शत्रुघ्न-रोशन चव्हाण, मारुती-संदेश वेंगुर्लेकर, चंद्रकेतू-बाळू मांजरेकर, गावकरीण-रवी सावंत, गावकर- कृष्णा घाटकर आदी कलाकार भुमिका साकारणार आहेत. तर त्यांना हार्मोनियम-प्रकाश सावंत व यश बाबर्डेकर, मृदूंगमणी अर्जुन सावंत व प्रमोद घावनळकर, झांज-शानू चव्हाण व सुहास बांबर्डेकर संगीतसाथ करणार आहेत. नाट्यप्रयोगासाठी लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तूत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर (मालक सिद्धेश कलिंगण), लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ, कुडाळेश्वर देवस्थान समिती, मित्रमंडळी व पत्रकार बंधु आदी विशेष सहाय्य करणार आहेत. ज्या व्यक्तींना या लोकराजा महोत्सवासाठी आर्थिक मदत करावयाची असेल त्यांनी अध्यक्ष चारुदत्त तेंडोलकर-९४०३३६४७४१ व सचिव निळकंठ सावंत-८२७५३६४९८०

या नंबरवर गुगल पे करून मदत करावी. या नाट्य महोत्सवातील खास आकर्षण म्हणजे उपस्थित कुडाळ तालुक्यातील दशावतार कलाकारांमधून १० भाग्यवान विजेत्यांना माझा लोकराजा लकी ड्रॉ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या लोकराजा महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा व नाट्यप्रयोगाचा दशावतार कलाकारांनी व दशावतार प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुडाळ तालुका पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशिय संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!