आ.भास्करराव जाधव यांच्या विकासात्मक कार्यशैलीवर प्रभावित..
▪️शिव मधील शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.०८: गुहागर मतदारसंघात येणाऱ्या खेड तालुक्यातील शिव बुद्रुक या गावातील शेकडो ग्रामस्थांनी आज आमदार भास्करराव जाधव यांच्या विकासात्मक कार्यशैलीकडे आकर्षित होवून शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. ‘आम्ही वाट चुकलो होतो परंतु भास्करशेठ यांच्याशिवाय कोणीही विकास करू शकत नाही, हे आम्हाला कळून चुकले आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला’, असे उद्गार यावेळी प्रवेशकर्त्या ग्रामस्थांनी काढले.
शिव बुद्रुकमधील ग्रामस्थ श्री. भास्करराव जाधव हे राश्ट्रवादीत असताना त्यांच्यासोबतच होते. मात्र, मागील निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी त्यांची साथ सोडली होती. मात्र, आहे तिथे राहून गेल्या जवळपास दीड वर्षात गाव विकासापासून वंचित राहिला. आ.श्री. जाधव यांच्याशिवाय कोणीही आपला विकास करू शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर येथील ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज आ. श्री. जाधव यांच्या चिपळूण येथील जनसंपर्क कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. शिव गावातील मोहल्ला, मडीवाडी, श्रीरामवाडी, कुणबीवाडी, इनरकरवाडी आदी वाडयांमधील शेकडो ग्रामस्थ-महिलांनी शिवसेनेचा पटका खांदयावर घेतला. या सर्वांचे आमदार श्री. जाधव यांनी स्वागत केले.
म्हणूनच लोकांचं मला प्रचंड पाठबळ; आ. जाधव
गेल्या ३६ वर्षात सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत असताना आणि विकासाची कामे करीत असताना आपण कधी जात-पात, धर्म पाहिला नाही. राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये असताना आपण कधी शिवेसनेबद्दल गैर बोललो नाही आणि शिवसेनेत आल्यानंतर राष्ट्रवादी किंवा काॅंग्रेसबद्दल कधी अपशब्द काढला नाही. कुठेही असलो तरी कायम विकासाचेच राजकारण केले. त्यामुळेच एवढया प्रचंड संख्येने सर्वसामान्य लोकांचे पाठबळ मला कायम मिळत राहिले आहे, असे उद्गार यावेळी आ. श्री. जाधव यांनी काढले आणि आपण देखील आता जो आपला विकास करेल त्याच्या पाठिशी राहण्याची भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहन केले.
प्रवेशकर्त्यांमध्ये नजीर फिरफिरे, हुसैन पालेकर, वसिम मुकादम, समीर पवार, दिपक पवार, अखलाख मुकादम, प्रल्हाद पवार, आहमद परकार, अमित पाष्टे, शांताराम डफळे, सुनिल डफळे, अशोक रेमजे, राजेश पवार, प्रथमेश पवार, आमीना नोरे, साक्षी करजावकर, गीता शिगवण, ममता शिगवण, प्रतिभा पवार, अनिल शिगवण, तृप्ती पवार, इनायत करबेलकर, युसुफ पोलेकर, हरिष्चंद्र पालेकर, नारायण गावडे, किरण लवंडे, लाईक नोरे, गणेश पवार, हर्षद पवार, राजेश नरळकर, दाउद देसाई, अ. रहिमान चैगुले, तेजस डफळे, तेजस डफळे, सौरभ रेमजे, सुरेश पाष्टे, विकास शिगवण, सुधीर कोतेरे, अंकुश पांचागळे, अनंत शिगवण, सुदेश जावळे, सखाराम गोवळकर, पर्षुराम काळे, स्वप्नील पाष्टे, कृष्णा जावळे आदींचा समावेश आहे.
या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी आ.श्री. जाधव यांचे जवळचे सहकारी श्री. फैसल कास्कर, निळीकचे सरपंच श्री. अ. रहेमान चैगुले, युवा सेनेचे चिपळूण तालुका अधिकारी श्री. उमेश खताते, शहर अधिकारी निहार कोवळे, शाखाप्रमुख राजेश लवंदे आदी उपस्थित होते.
_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
*🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_
_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_
_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

