सावंतवाडीतील १३३ गाळे धारकांच्या पाठीशी आम्ही शिवसेना म्हणून उभे राहू; डॉ.जयेंद्र परुळेकर
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : निलेश लाड
🎴सावंतवाडी,दि.०८: काही झाले तरी “त्या” १३३ गाळे धारकांच्या पाठीशी आम्ही शिवसेना म्हणून उभे राहू, रवी जाधव यांचा स्टॉल त्यांना त्याच ठिकाणी पुन्हा उभारुन देऊ, असा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी दिला. दरम्यान ग्रामीण भागातून येणाऱ्या भाजी विक्रेत्या महिलांसाठी आम्ही जागा उपलब्ध करून देऊ, वेळ पडल्यास त्यांच्यासाठी आम्ही आठवडा बाजार सुरू करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, दिपाली सावंत, भारती मोरे, माधुरी वाडकर, शुभांगी सुकी, रवी जाधव, संजय पेडणेकर आदी उपस्थित होते.
श्री.परुळेकर पुढे म्हणाले, सद्यस्थितीत नगराध्यक्षांचा मनमानी कारभार सुरू आहे. डिक्री झालेल्या जागेत जाधव यांच्या स्टॉलसह आणखीन सात स्टॉल आहेत. मात्र, केवळ त्यांच्यावरच पालिकेकडून अन्याय करण्यात आला आहे. हा अन्याय नेमका कशासाठी? त्यांना पैशांची अपेक्षा आहे का? असा सवाल उपस्थित केला. तर बाजारपेठेत भाजी विक्रीसाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. कारण त्यांना पालिकेकडून याठिकाणी बसण्यासाठी जागा दिली जात नाही. त्यामुळे त्यांच्यावर रस्त्यावर फिरून भाजी विकण्याची वेळ येत आहे. हा पालिकेकडून स्थानिकांवर अन्याय केला जात आहे. त्यासाठी आम्ही त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून बसण्याची जागा उपलब्ध करून देऊ, वेळप्रसंगी त्यांच्यासाठी विशेष आठवडा बाजार सुरू करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
*_🔥आम्ही आपल्याला देऊ बारा लाखात घर..🔥_*
⚡आपल्याला हक्काचे घर🏠 हवे आहे? आपण घराच्या🏡 शोधात आहात? आपल्याकडे जमवलेली पुंजी💰 कमी पडत आहे? निराश होऊ नका!😊
*💫सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर आम्ही आपल्या देऊ बारा लाखात साडे पाचशे स्क्वेअर फुट सदनिका, तसेच सावंतवाडी शहरात व शहराच्या आसपास एन ए प्लॉट उपलब्ध..🤝*
🙅🏻♂️कोणतीही कायदेशीर कटकट नाही. सगळे व्यवहार पारदर्शी!💥
*😊व्यवहार पूर्ण होईपर्यंत व ताबा मिळेपर्यंत आम्ही देणार आहोत सर्व प्रकारची मदत..🙌*
💫चला तर मग! आपले स्वप्न सत्यात उतरवा..⚡
_*🤷🏻♂️संपर्क : सीताराम गावडे*_
_*संपादक कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल,*_
न्यू सबनिसवाडा, बिरोडकरटेंब, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
_*🙋🏻♂️मोबाईल ⬇️*_
_*📱8484827993*_
_*📱9423304856*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

