कसाल ग्रामपंचायत येथील लिपिक प्रशांत राणे यांना वाहण्यात आली श्रद्धांजली..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि.०८: मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथे बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मोटर सायकल व कार यांच्या अपघातात कसाल येथील ग्रामपंचायत कर्मचारी प्रशांत राणे यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने कसाल गावात पूर्ण शोककळा पसरली होती.
प्रशांत राणे हे कसाल ग्रामपंचायत येथे सन २००५ पासून लिपिक पदावर कार्यरत होते. अतिशय मनमिळावू, शांत स्वभावाचे सर्वांची कामे हसत मुखाने करणारा व्यक्ती म्हणून ते आपल्या कार्यालयात परिचित होते. आज त्यांच्या जाण्याने कसाल ग्रामपंचायत येथे त्यांची कायम उणीव भासणार आहे. असे पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर यांनी कसाल ग्रामपंचायत येथे घेतलेल्या शोकसभेत आज बोलताना सांगितले.
आज कसाल ग्रामपंचायतीच्या वतिने प्रशांत राणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ. संगीता परब, उपसरपंच दत्ताराम सावंत, पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर, ग्रामविकास अधिकारी सौ. शालिनी कोकरे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष राणे, पोलीस पाटील अनंत कदम, ग्रामपंचायत सदस्या, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, शिपाई दत्ताराम निर्गुण, सफाई कामगार बाळा शिंगाडे, माजी उपसरपंच मळगावकर, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, नागरिक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

