कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑जिल्ह्यात काही दिवसांच्या उसंतीनंतर मान्सूनचे पुनरागमन.

*🛑जिल्ह्यात काही दिवसांच्या उसंतीनंतर मान्सूनचे पुनरागमन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १३:-* गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या मान्सूनच्या पावसाचे गुरुवारपासून पुन्हा आगमन झाले आहे. यावर्षी मान्सूनचे आगमन सुमारे १२ दिवस अगोदर म्हणजे २५ मे रोजी सिंधुदुर्गमध्ये झाले होते. आठवडाभर दमदार पाऊस झाल्यानंतर पावसाने उघडीप घेतली होती. गुरुवापासून पुन्हा पावसाने जोर धरला असून हवामान खात्यानेही पुढील काही दिवस पावसाचा जोर राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावर्षी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मध्य-पूर्व अरबी समुद्रात रत्नागिरी किनाऱ्याजवळ हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन मान्सूनच्या आगमनावर दबाव निर्माण झल्याने सामान्यतः १ जूनला केरळमध्ये येणारा मान्सून २४ मे रोजीच आला. सिंधुदुर्गमध्ये ५ ते ६ जूनला सामान्यतः येणारा मान्सून सुमारे १२ दिवस अगोदर म्हणजे २५ मे रोजीच दाखल झाला.

त्यानंतर २६ मे रोजी मान्सून मुंबईपर्यंत पोहोचल्याचेही जाहीर करण्यात आले होते. मात्र, २६ मेनंतर मान्सूनमध्ये फारशी प्रगती दिसत नव्हती. महाराष्ट्र व्यापून मराठवाड्यापर्यंत मजल मारलेला मान्सून ११ जूनपर्यंत रेंगाळतच राहिल्याचे दिसत होते. मात्र, १२ जूनपासून मान्सूनने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात गुरुवारी मान्सूनच्या दमदार सरी कोसळल्या. १३ जूननंतर पुढील काही दिवस ऑ रेंज अलर्टचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे मध्ये काही दिवस उसंत घेतलेल्या मान्सूनचे पुन्हा एकदा आगमन झाले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!