कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन.

*🛑प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- १३:-* केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत दरवर्षी निःस्वार्थी कृती व अतुलनीय शौर्य गाजविलेल्या बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. या अनुषंगाने क्रीडा, खेळ, सामाजिक सेवा, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, कला व संस्कृती आणि नावीन्यपूर्ण काम या क्षेत्रात अतुलनीय कार्य केलेले कोणतेही बालक, जे भारतीय नागरिक असून ज्याचे वास्तव्य भारतात आहे, व ज्याचे वय १८ वषपिक्षा जास्त नाही, तसेच उच्च कोटीची असामान्य क्षमता व कौशल्य मिळविलेल्या बालकांकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२५ साठी अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वैशाली काकडे यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार खालील दोन प्रकारात देण्यात येतो.

बाल शौर्य पुरस्कार नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून, प्राणाची बाजी लावून अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्या किंवा प्रसंगावधान राखून तात्काळ प्रतिसाद देऊन स्वतःला किवा समाजातील कुणालाही वाचविणाऱ्या शूर बालकाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शोर्य पुरस्कार दिला जातो.

बाल नैपुण्य पुरस्कार – प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल नैपुण्य पुरस्कार हा क्रीडा, सामाजिक सेवा, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, कला व संस्कृती, नावीन्यपूर्ण शोध या ६ प्रकारात असामान्य यश, उच्चकोटीची असामान्य क्षमता व कौशल्ये मिळविणाऱ्या बालकाला दिला जातो.

पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व १ लाख रु.रोख रक्कम असे राहील देशात २५ पुरस्कार दिले जातात. पुरस्कार २६ डिसेंबर रोजी घोषित केला जाऊन जानेवारीमध्ये वितरण केले जाते राष्टीय निवड समितीकडून पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी सार्वजनिकरित्या खुले नामनिर्देशन हे केवळ (http://awards.gov.in) या पोर्टलवर स्विकारले जाईल, पोर्टलव्यतिरिक्त प्राप्त होणारे नामनिर्देशन अर्ज स्विकारले जाणार नाहीत. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२५ साठी ऑनलाईन नामनिर्देशने स्विकारण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै, २०२५ रोजीपर्यंत आहे. भारत सरकार महिला व बाल विकास मंत्रालय, नवी दिल्ली, यांचे कार्यालयीन संकेतस्थळ (ww.wod.nic.in) वर उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, ओरोस सिधुदुर्गनगरी, दुरध्वनी क्र ९४०४४४४९२२ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वैशाली काकडे यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!