गवा रेड्याची चालत्या रिक्षाला धडक;रिक्षा झाली पलटी
गवा रेड्याची चालत्या रिक्षाला धडक;रिक्षा झाली पलटी
माजगांव दत्तमंदिर परिसरातील घटना
सावंतवाडी, दि. ०६:- शिरोडा मार्गांवर माजगांव दत्तमंदिर नजीक डॉ. निर्मला सावंत यांच्या घराशेजारी गवा रेड्याने रिक्षेला धडक दिली. यामध्ये रिक्षा रस्त्यावर पलटी झाली. ही घटना रात्री ९. ३० च्या सुमारास घडली. त्वरित ग्रामस्थांनी घटना धाव घेत मदतकार्य केले. याबाबत अधिक माहिती अशी की मळगांव येथील रिक्षाचालक हे सावंतवाडी हुन मळगांव येथे जात असताना माजगांव दत्तमंदिर परिसरात पोहोचताच गवारेडा अचानक रस्त्यावर आला आणि रिक्षाला जोरदार धडक दिली. ह्याअपघातात रिक्षाचालक आनंद शिवराम परुळेकर वय ४८, राहणार मळगांव, सावंतवाडी हे जखमी झाले असून अधिक उपचारासाठी उपजिल्हारुग्णालय सावंतवाडी येथे दाखल केले आहे.

