‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र जागृती सभेने जागवले ७८ हजाराहून अधिक हिंदूंमध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेचे स्फुल्लिंग..

▪️धर्मरक्षणाच्या कार्यात मतभेद विसरून हिंदु संघटित झाल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना दूर नाही; हिंदु जनजागृती समिती राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴सिंधुदुर्ग,दि.०७: ‘भारतामध्ये अल्पसंख्यांकांना मिळणारे विशेष प्राधान्य आणि सवलतींमुळे विविध प्रकारचे ‘जिहाद’ डोके वर काढत आहेत. हिंदूंना अत्याचारी इतिहास विसरायला भाग पाडून त्यांना असहिष्णू ठरवले जात आहे. पण या अपप्रचाराला न भुलता सत्य इतिहास शिकवण्यासाठी सरकारकडे आग्रह धरला पाहिजे. सध्या ‘हलाल सर्टिफिकेट’ नावाची एक नवीन समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली असून यातून निर्माण झालेला पैसा भारतात गुन्हे घडविण्यासाठी वापरला जात आहे. यासाठी ‘हलाल’चा शिक्का असणारी उत्पादने खरेदी करू नका. धर्मरक्षणाच्या कार्यात सर्व मतभेद विसरून, संघटित शक्ती दाखवून दिल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना दूर नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त बोलत होते.

सभेच्या आरंभी शंखनाद करण्यात आला. त्यानंतर सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी दीपप्रज्वलन केले. हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर वेदमंत्रपठण झाले. नंतर वक्त्यांची जाज्वल्य भाषणे झाली. ही सभा ‘यु ट्यूब लाइव्ह’ आणि ‘फेसबुक’ यांच्या माध्यमांतून ७८ हजाराहून अधिक लोकांनी पाहिली.

या सभेत बोलतांना श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले की, हिंदु धर्माने कधीही कोणत्याही धर्माला हिणवले नाही. ईश्‍वर एक आहे; मात्र त्याचे स्वरूप वेगवेगळे आहे अशी शिकवण हिंदु धर्म देतो. अनेक परकीयांनी भारतावर आक्रमण करून हिंदूंवर अनेक अत्याचार केले, संपत्ती लुटली, देवळे उध्वस्त केली, हिंदु संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला कारण हिंदु समाज संघटित नव्हता. हिंदूंनो, पुन्हा अशी स्थिती येऊ नये, यासाठी स्वतःमध्ये धर्मतेज निर्माण करून देव, देश, आणि धर्म यांचे रक्षण करा, असे आवाहनही श्री. मुतालिक यांनी केले.

सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव या वेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘आज देश आणि धर्म संक्रमण अवस्थेतून जात आहे. कोरोनाच्या काळात पाश्‍चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण किती अवैज्ञानिक होते, हे दिसून आले आणि संपूर्ण जगाने हात जोडून नमस्कार करण्याची अभिवादनाची पद्धत स्वीकारली. ऋषिमुनींनी सांगितलेले आणि धर्मग्रंथांतील धर्माचरण मागासलेले नसून त्याच्या प्रत्येक कृतीच्या मागे वैज्ञानिक कारण आहे. त्यामुळे हिंदु संस्कृतीचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करा आणि श्रद्धेने धर्माचरण करा. धर्माचरणामुळे आत्मबळ निर्माण होते आणि कठीण परिस्थितीचा सामना करता येतो.’

यावेळी अखिल भारतीय वीरशैव लिगायत महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अन् प्रवक्ता डॉ. विजय जंगम (स्वामी) म्हणाले, ‘हिंदूंमध्ये हिंदु धर्माविषयी जागृती करावी लागते हे दुर्दैव आहे. हिंदू धर्मातील अनेक पंथ स्वतःचा धर्म स्थापन करण्याची मागणी करत आहेत. हे हिंदूंना फोडण्याचे षडयंत्र आहे. लिंगायत समाजही हिंदु धर्माचाच एक भाग आहे, हे लक्षात घ्यावे. राष्ट्राची प्रगती करायची कि निर्वंश, हे आपण हिंदूंनी ठरवायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा आदर्श घेऊन हिंदु राष्ट्राचा संकल्प करूया.’

या सभेत धर्मवीरांनी दाखवलेली स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके आणि बालसाधकांनी केलेले धर्मचरणाचे आवाहन लक्षवेधी ठरले. यावेळी धर्मशिक्षणविषयक फ्लेक्स् प्रदर्शनही दाखविण्यात आले. सभेच्या शेवटी हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी, तसेच हिंदूंच्या विविध मागण्यांसाठी ठराव पारित करण्यात आले, याला उपस्थितांनी ‘ऑनलाईन अभिप्राय’ देऊन समर्थन दिले.

🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*

🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.

🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर  पर्वरी-गोवा संचलित….!*

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.

✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.

  ✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर  गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड  विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी   ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘‍♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️  24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣

*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००

*टीप-*  उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!