🛑दोडामार्ग तहसिलदार अमोल पवार यांना शोधून खुर्चीत बसविणाऱ्या ला ५१ हजाराचे बक्षीस.
*🛑दोडामार्ग तहसिलदार अमोल पवार यांना शोधून खुर्चीत बसविणाऱ्या ला ५१ हजाराचे बक्षीस.*
*🛑शिवसेना जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी जाहीर केले बक्षीस.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- ३०:-* तालुक्याचे तहसीलदार अमोल पोवार गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याने ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी त्यांना शोधून खुर्चीवर बसवणाऱ्यास ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. सध्या शैक्षणिक प्रवेशाचा काळ असतानाही तहसीलदार पोवार सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचा आरोप धुरी यांनी केला आहे, ज्यामुळे महसूल विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की, दोडामार्ग तहसीलदार अमोल पोवार बेपत्ता असल्याने प्रभारी तहसीलदार काम पाहत आहेत. यामुळे तालुक्यातील ५८ गावांमध्ये महसूल यंत्रणेवर कोणाचा अंकुश राहणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात पूरपरिस्थितीसारख्या आपत्कालीन स्थितीत तहसीलदारांची उपस्थिती अत्यंत महत्त्वाची असते, मात्र अशा वेळीही तहसीलदार गैरहजर राहिल्याने जनतेमध्ये महसूल विभागाविरुद्ध तीव्र रोष निर्माण झाला आहे. सरकार नियुक्त अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी सोडून दिल्याचा आरोप करत, तहसीलदार पोवार यांनी आनंदाने सुट्टी घ्यावी पण त्यांना दोडामार्ग तहसीलदार पदापासून मुक्त करावे, अशी मागणी केली आहे. महसूल विभागाच्या कामकाजातील या त्रुटीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठीच त्यांनी ५१ हजार रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केल्याचे सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

