कोणत्याही परिस्थितीत रवी जाधव यांना डीक्री  झालेल्या जागेत दुकान लावू देणार नाही; नगराध्यक्ष परब

▪️मुख्याधिकार्‍यांवर दबाव असेल तर त्यांनी बदली करून जावे; मात्र चुकीचे काम होऊ देणार नाही

▪️सावंतवाडीतील अनधिकृत स्टॉल हटले तर त्याला शिवसेना आमदार, मंत्री, नगरसेवक जबाबदार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.०५: रवी जाधव यांना स्टॉलची व्यवस्था करून द्यावी अन्यथा शहरातील अनधिकृत स्टॉल त्वरित हटवावेत असे आदेश नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सावंतवाडी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना आल्याने ते सध्या द्विधा मनस्थितीत सापडले असून कोणत्याही परिस्थितीत डिक्री झालेला जागेत रवी जाधव यांना स्टॉल लावू देणार नाही प्रसंगी तुम्ही बदली करून जावे व कोणतेही बेकायदेशीर निर्णय घेतल्यास त्याला मुख्याधिकारी जबाबदार राहतील असा इशारा नगराध्यक्ष संजू परब यांनी मुख्याधिकार्‍यांना दिला असल्याचे परब यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

शहरात १३३ अनधिकृत स्टाॅल आहेत हे सर्व सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या सर्व घटनेला स्थानिक आमदार दीपक केसरकर, शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचा आरोप संजू परब यांनी केला आहे.

डिक्री झालेल्या जागेत जाधव यांना अनधिकृत स्टॉल कोणत्याही परिस्थितीत लावता येणार नाही, प्रसंगी तुम्ही बदली करून घ्या, मात्र अनधिकृत स्टाॅल चे काम आम्ही तुम्हाला करू देणार नाही व याबाबत तुम्ही कोणतीही भूमिका घेतल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार आपण राहाल असा लेखी इशारा संजू परब यांनी मुख्याधिकारी दिल्याचे सांगितले.

यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी उपस्थित होते.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!