कुडाळकृषिशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

उद्योगपती संजय किर्लोस्कर यांचे १७ रोजी किर्लोस गावात आगमन; ब्रिगेडियर सुधीर सावंत

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कसाल,दि.०५: कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचा रौप्य महोत्सव १७ फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. त्यानिमित्त विविध शेती विषयक कार्यक्रम किर्लोस येथे होणार आहेत. कृषी विज्ञान केंद्राचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या खास प्रयत्नातून किर्लोस्कर उद्योग समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर हे रौप्य महोत्सवाच्या उद्घाटनाला आज येणार आहेत. किर्लोस्कर हे मूळ मालवण तालुक्यातील किर्लोस गावचे आहेत. त्यांचे वारसदार किर्लोस येथे आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या साधनांचा उद्योग सुरू करून यांनी किर्लोस्कर उद्योग समूहाचे नाव जागतिक पातळीवर नेले आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या रोपे महोत्सवाचे उद्घाटन उद्योगपती संजय किर्लोस्कर यांच्या हस्ते होणार आहे. ते सहकुटुंब येणार असून किर्लोस येथील मूळ गावी यांचे पहिल्यांदा जिल्ह्यात आगमन होणार आहे. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात समृद्ध गाव योजना राबविण्यात येत आहे. समृद्ध आणि आनंदी जीवन बनविण्यासाठी स्वावलंबी गावाची निर्मिती करण्यासाठी विविध उपक्रम कृषी विज्ञान केंद्राद्वारे राबविण्यात येतात गावातील शेती उद्योगांना चालना मिळण्यासाठी खास प्रयत्न होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रांना चालना मिळण्यासाठी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या खास प्रयत्नातून संजय किर्लोस्कर यांचे आगमन होणार आहे. यांच्यासोबत मँप्रोचे व्यवस्थापकीय संचालक मयूर ओरा आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाँ. संजय सावंत येणार आहेत. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विज्ञान चे उपाध्यक्ष प्रदीप सावंत यांनी दिली आहे.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*

*🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️*

*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_*

*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_

*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

        *🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!