🛑विद्यार्थ्यांना उद्यापासून उन्हाळा सुट्टी!
*🛑विद्यार्थ्यांना उद्यापासून उन्हाळा सुट्टी!*
*🛑शिक्षकांना ५ मेपर्यंत यावे लागणार शाळेत;अंतिम सत्राची परीक्षा आज संपणार;शिक्षकांना वर्षात असतात १२८ सुट्ट्या*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मुंबई, दि- २५:-* चालू शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा उद्या (शुक्रवारी) संपणार आहेत. त्यानंतर २६ एप्रिलपासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्या लागणार आहेत. पण, शिक्षकांना ५ मेपर्यंत शाळेत यावेच लागणार आहे. रमझान ईद आणि वेळ आमवस्येची सुटी कामाच्या दिवशी घेतल्याने शिक्षकांची उन्हाळा सुटी दोन दिवस लांबणार आहे.
दरवर्षी शैक्षणिक वर्षातील २२० दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन होणे आवश्यक आहे. त्यात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे दिवस वगळून शैक्षणिक वर्षात किमान ८०० तास तर इयत्ता सहावीच्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांचे एक हजार तास अध्यापन बंधनकारक आहे. त्यानुसार अध्यापनाच्या तासांचे नियोजन अपेक्षित असते. या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अंतिम सत्र उरकण्याची शाळांची पद्धत बंद केली. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातून सुरू झालेली अंतिम सत्र परीक्षा २५ एप्रिलपर्यंत चालू राहिली.
शुक्रवारी (ता. २५) २०२४-२५ च्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा शेवटचा दिवस असणार आहे. २६ एप्रिलपासून विद्यार्थ्यांना उन्हाळा सुट्या लागतील. १ मे रोजी शाळांकडून विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल (प्रगतीपत्रक) जाहीर होईल. त्यानंतर देखील शिक्षकांना पुढचे चार दिवस शाळेत यावे लागणार आहे. दरम्यान, पटसंख्या कमी होत असल्याने अनेक शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची टांगती तलवार असल्याने पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षकांना पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
*दरवर्षी शिक्षकांना १२८ दिवस सुट्या*
दरवर्षी शैक्षणिक वर्षात शिक्षकांना तथा शाळांना १२८ दिवस सुट्या असतात.
७६ सार्वजनिक सुट्या असतात आणि त्यात उन्हाळा, दिवाळी सुट्या असतात. याशिवाय वर्षात ५२ रविवार देखील येतात. वर्षातील ३६५ दिवसांतून २३७ दिवस उरतात, पण त्यात अध्यापनाचे तास ठरल्याप्रमाणे व्हायला पाहिजेत असा नियम आहे.
*१५ जूनपासून शाळा सुरू होतील*
विद्यार्थ्यांना २६ एप्रिलपासून तर शिक्षकांना ६ मेपासून उन्हाळा सुट्या असतील. पुढे १५ जूनला शाळा सुरू होतील. दरम्यानच्या काळात शिक्षकांनी तथा प्रत्येक शाळेने चालू पटसंख्येत किमान १० टक्के वाढ होईल, यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना केल्या आहेत.
-कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

