अखेर सातार्डा-पाडलोस-सावंतवाडी एसटी सुरू..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : बांदा
🎴बांदा,दि.०४: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बंद करण्यात आलेली सातार्डा पाडलोसमार्गे सावंतवाडी (वस्तीची गाडी) एसटी बस वाहतूक सेवा नागरिकांसह विद्यार्थ्यांची वाहतुकीची होणारी अडचण पाहून दूर करण्यात आली आहे. यासाठी शिवसेना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले होते.
पाडलोस रवळनाथ मंदिराजवळील बस थांब्याकडे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच अक्षरा पाडलोसकर तर ग्रामस्थांच्यावतीने आनंद गावडे यांनी स्वागत केले. यावेळी शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, युवासेना मळेवाड विभाग प्रमुख समीर नाईक, पाडलोस शाखाप्रमुख महेश कुबल, ग्रामस्थ अमेय गावडे, श्रीधर परब, बबलू नाईक, रोहन सातार्डेकर, भीमसेन माधव, जयराम गावडे, बापू माधव, गिरीश येडवे, पूजा येडवे, संतोष आंबेकर, मनोज माधव तर केणीवाडा येथे तुळशीदास नाईक, अक्षय जाधव, आर्यन केणी, एकनाथ कुबल, भूषण केणी, सिद्धेश कोरगावकर आदी उपस्थित होते.
सातार्डा ते सावंतवाडी दरम्यान अनेक गावांतील नागरिकांना सकाळ व संध्याकाळच्यावेळी घर गाठणे किंवा कामासाठी बाहेर पडणे कठीण होत होते. त्यामुळे पाडलोस ग्रामपंचायतने सावंतवाडी एसटी आगार व्यवस्थापकांना लेखी पत्र देऊन सदर गाडी सुरू करण्याची मागणी केली होती. सावंतवाडीतील सातार्डा, साटेली, आरोस, दांडेली, न्हावेली-रेवटेवाडी, पाडलोस, रोणापाल, मडुरा, शेर्लेसह बांदा, इन्सुली माजगावातील नागरिकांना सातार्डा पाडलोसमार्गे सावंतवाडी या वस्तीच्या गाडीचा मोठ्याप्रमाणात उपयोग होणार आहे. आरोससारख्या ठिकाणी सावंतवाडीवरून जाण्यायेण्यासाठी एसटीवाहतूक सेवा नसल्याने प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी आगार व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, सावंतवाडी आगार व्यवस्थापकांनी ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्यात झालेल्या चर्चेत सातार्डा पाडलोसमार्गे सावंतवाडी गाडी सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देऊन बुधवारपासून सावंतवाडी पाडलोसमार्गे सातार्डा एसटी गाडी सुरू केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

