आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 दोडामार्ग केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश

🛑 स्पृहा दळवी, अद्विका काळे या विद्यार्थीनी राज्यात अव्वल

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१८:- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये केंद्र शाळा दोडामार्ग नं १ मधील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी झाले होते. एसटीएस परीक्षा, गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा, बी.डी.एस परीक्षा, बीटीएस परीक्षा मंथन प्रज्ञाशोध परीक्षा, एसटीएस परीक्षा अशा विविध परीक्षांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले यामध्ये इयत्ता दुसरीतील कुमारी अद्विका दिगंबर काळे व कुमारी स्पृहा सुमित दळवी यांनी गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये शंभर टक्के गुण मिळवून संयुक्तरीत्या राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. कुमारी अद्विका दिगंबर काळे हिने एसटीएस परीक्षेत सुवर्णपदक, बी टी एस परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक, बीडीएस परीक्षेत रौप्य पदक, तसेच मंथन परीक्षेत देखील चषक मिळवला आहे. त्याचबरोबर कराटेच्या परीक्षेमध्ये देखील सुवर्णपदकाची कमाई करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कुमारी स्पृहा सुमित दळवी एसटीएस परीक्षेत गोल्ड मेडल, बी टी एस परीक्षेत तालुक्यात तृतीय क्रमांक, मंथन परीक्षेत राज्यात सातवा क्रमांक, बीडीएस परीक्षेत उत्तम यश संपादन केलेले आहे. तसेच आंतरराज्य वक्तृत्व स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धेमध्ये भाग घेत असताना विविध ऐतिहासिक वेशभूषा सादर करताना जिजाऊ, हंबीरराव मोहिते, बाजीप्रभू, ताराराणी, छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्तिरेखा सादर करून शाळेला नावलौकिक प्राप्त करून दिला आहे. कुमार राजवीर विश्वजीत सावंत याने एसटीएस परीक्षा तसेच गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा यामध्ये उज्वल यश संपादन केले आहे. कुमारी तन्वी श्रीराम गवस, कुमारी आद्या मिनार मणेरीरकर,कुमारी ऐश्वर्या महादेव सावंत, कुमारी सानिका सतीश मिरकर, कुमार श्रवण संतोष गवस, कुमार मंदार दत्ता डांगी या विद्यार्थ्यांनी देखील एसटीएस परीक्षा व बीटीएस परीक्षा या परीक्षेमध्ये भाग घेऊन उत्तम यश संपादन केले आहे. इयत्ता तिसरीतील कुमारी निधी यशवंत गवस हिने एसटीएस परीक्षेत सुवर्णपदक बीटीएस परीक्षेत तालुक्यात दुसरा क्रमांक, बी डी एस परीक्षेत रौप्यपदक, मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत चषक संपादन केलेले आहे. कुमार आराध्य संजय गवस एसटीएस परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. इयत्ता चौथी कुमारी ईशा सोमेश देसाई हिने एसटीएस परीक्षा तसेच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा यामध्ये उज्वल यश संपादन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका सौ. एकता नाईक, श्रीम. वर्षा काळे, श्री. जयसिंग खानोलकर, मुख्याध्यापक श्री. जयसिंग गावीत यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्व पालकांनी करवून घेतलेल्या सातत्यपूर्ण सरावामुळे विद्यार्यांना हे यश मिळवता आले.विद्यार्थांनी मिळविलेल्या या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!