गोव्याहून बेळगांवला जाणारी गोवा बनावटी दारू पकडली
गोव्याहून बेळगांवला जाणारी गोवा बनावटी दारू पकडली
सुमारे ८ लाख किंमतीचा दारू सह मुद्देमाल जप्त: आंबोली घाटात सनसेट पॉईंट येथे करण्यात आली कारवाई
सावंतवाडी, दि. १८:- आज दि.१८ एप्रिल रोजी दुपारी ३. ३० वा. सुमारास बांदा ते संकेश्वर जाणारे महामार्गावर आंबोली घाटात सनसेट पॉईंट येथे आज गोवा बनावटी दारू वाहतूक करणारी कार पकडण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की चालक यशवंत दिपक शितोळे, वय-34 बर्षे, रा.बेळगाव, वीरभद्रनगर, जि. बेळगाव, राज्य-कर्नाटक, याने त्याच्या ताब्यातील हयुंडाई कंपनीची XCENT कार रजि. नं.MH-04-GD-9643 या वाहनामध्ये गोवा येथे भरुन सदरचे वाहन आंबोली घाटात भरधाव वेगात चालवून पोलीसांनी त्यास थांबण्याचा इशारा केला असता त्याकडे दुर्लक्ष करुन गैरकायदा बिगरपरवाना गोवा बनावटीची दारु आपले ताब्यातील गाडीमध्ये बाळगून गोवा ते बेळगाव अशी आंबोली घाट मार्गे वाहतुक करीत घेऊन जात असताना आंबोली सनसेट पॉईंट येथे मिळुन आलेला आहे. सदर वाहनाच्या चालकाकडे 8,00,000/- रू एक पांढ-या रंगाची हयुंडाई कंपनीची XCENT कार,46,575/- रु. किंगफिशर बिअर असे इंग्रजी नावाच्या 500 मिली. मापाचे प्रत्येकी 24 टीनप्रमाणे एकूण 02 बॉक्स व सुटे 159 टीन असे मिळून एकूण 207 टीन असून प्रत्येक टीनची किमंत 225/- प्रमाणे 18,810/-KINGFISHER STRONG PREMIUM LOGER BEER असे इंग्रजी नावाचे लेबल असलेल्या 750 मिली. मापाच्या काचेच्या प्रत्येकी 12 बाटल्याप्रमाणे एकूण 03 बॉक्स व सुटया 21 बाटल्या, एकूण 57 बाटल्या असून प्रत्येक बाटलीची किमंत 330/-प्रमाणे कि.सू. 17,600/- TUBORG PREMIUM BEER ORIGINAL GREEN असे इंग्रजी नावाचे लेबल असलेल्या 750 मिली. मापाच्या काचेच्या प्रत्येकी 12 बाटल्याप्रमाणे एकूण 02 बॉक्स व सुटया 31 बाटल्या एकूण 55 बाटल्या असून प्रत्येक बाटलीची किमंत 320/- प्रमाणे कि.सू. 9140/-MAGIC MOMENTS REMIX GREEN APPLE FLAVOURED VODAKA असे इंग्रजी नावाच्या 750 मिली मापाच्या एकूण 08 काचेच्या बाटल्या, प्रत्येकी बाटलीची किमंत 1140/- रु. प्रमाणे कि.सू.,9,000/-MCDOWELLS NO.1 CELEBRATION MATURED XXX RUM असे इंग्रजी लेबल असलेल्या 180 मिली मापाच्या एकूण 45 काचेच्या बाटल्या, प्रत्येकी बाटलीची किमंत 200/- रु. प्रमाणे कि.सू.
म्हणून नमूद इसमाचे विरोधात पोलीस अंमलदार मनिष शिंदे यांनी दिले फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला असून. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री. निसर्ग ओतारी, यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली पोलीस दुरक्षेत्रचे पोलीस हवालदार दिपक शिंदे, मनिष शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल राजेश नाईक यांनी केलेली आहे.

