आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑 रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्रीडा महाकुंभ सोहळा

🛑 भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती ; खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि-०३:– माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ६ ते ११ एप्रिल या कालावधीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत क्रीडा महाकुंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा महाकुंभ सोहळ्याअंतर्गत विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक तालुक्यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. क्रीडा महाकुंभ सोहळ्याअंतर्गत दोन्ही जिल्ह्यांतील क्रीडा चळवळीला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

येथील प्रहार भवनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. सावंत बोलत होते. यावेळी डाॅ. मिलिंद कुलकर्णी, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, महेश उर्फ बंड्या नारकर, सुधीर नकाशे, खासदार राणे यांचे स्वीय सहाय्यक संदीप भोसले आदी उपस्थित होते.

रविवार ६ एप्रिल रोजी सावंतवाडी तालुक्यात सावंतवाडी तलावाच्या शेजारी मॅरेथाॅन स्पर्धा होणार आहे. सोमवार ७ एप्रिल रोजी वेंगुर्ले तालुक्यातील वेंगुल कॅम्प येथे हाॅलिबाॅल स्पर्धा होणार आहे. मंगळवार ८ एप्रिल रोजी वैभववाडी तालुक्यात दुर्गामाता पटांगणावर रस्सीखेच स्पर्धा होणार आहे. याच दिवशी कणकवली तालुक्यातील नगरपंचायतीच्या क्रीडा संकुलात बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे. बुधवार ९ एप्रिल रोजी दोडामार्ग तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा येथे कबड्डी स्पर्धा होणार आहे. गुरुवार १० एप्रिल रोजी देवगड तालुक्यातील देवगड-जामसंडे येथे सायक्लोथाॅन स्पर्धा होणार आहे. यात दिवशी मालवण तालुक्यातील देऊळवाडा ते कोंबळब्रिज याठिकाणी सायक्लोथाॅन स्पर्धा होणार आहे. कुडाळ तालुक्यातील वासुदेवनंद हाॅल येथे जिल्हास्तरीय कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे.

गुरूवार १० एप्रिलला संगमेश्वर तालुक्यात देवरुख येथील काजीवरा मैदानावर रत्नसिंधु महा केसरी भव्य खुली बैलगाडा शर्यत स्पर्धा आयोजित केली आहे. शुक्रवार ११ एप्रिल रोजी राजापूर तालुक्यातील राजापूर तालुका हायस्कूल येथे हाॅलिबाॅल स्पर्धा आयोजित केली आहे. सायंकाळी ६ ते १० यावेळेत राजापूर येथील हायस्कूल मैदानावर महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित केली आहे. तालुकानिहाय होणाऱ्या स्पर्धांची तालुकानिहाय होणाऱ्या स्पर्धांचा जबाबदारी स्थानिक भाजपचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आली आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये खेळाडूंनी सहभागी व्हावे. तसेच या स्पर्धां पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सावंत यांनी केले.

 

कुपोषणमुक्तसीठी जिल्हा बॅंकेने घेतला पुढाकार

 

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून १० एप्रिल रोजी दोन्ही जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजने केली जाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा कुपोषणमुक्त व्हा, ही खासदार नारायण राणे यांची इच्छा आहे. त्यांची इच्छापूर्ती होण्यासाठी जिल्हा बॅंकेने पुढाकार घेतला असून जिल्ह्यातील ६६ कुपोषित मुलांना दत्तक घेण्याचे काम जिल्हा बॅंकेने घेतले असून त्यांच्या कुपोषणातून बाहेर काढण्याची जबाबदारी बॅंकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी घेतली आहे, अशी माहिती प्रभाकर सावंत यांनी दिली.

बाॅक्स

देवरूख, आेरोसमध्ये खा. राणे स्वीकारणार शुभेच्छा

खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस भाजप पक्षातर्फे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवाभावी व समाजोपयोगी उपक्रम साजरा केला जाणार आहे. १० एप्रिल देवरूख येथील मराठा भवन येथे सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत नारायण राणे हे वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणार आहे. आेरोस येथील शरद कृषी भवन येथे सायंकाळी ६ वा. नारायण राणे हे वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणार आहे. याच कार्यक्रमात विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक दिली जाणार आहेत, असे सावंत यांनी सांगितले.

 

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!