*▪️मे. ओट्रा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीचे संचालक श्री. सचिन ओटवणेकर यांना पोलीसांचा वरदहस्त*
*▪️चर्मकार समाज उन्नती मंडळाचा निवेदनातून आरोप*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*हार्दिक शिंगवे*
*🎴 सिंधुदुर्गनगरी:*
मे. ओट्रा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीचे संचालक श्री. सचिन ओटवणेकर यानी आमचे चर्मकार बंधु श्री. अरविंद महादेव गायकवाड यांना दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी अश्लील शिवीगाळ व मारहाण केली होती. सिधुदुर्गनगरी पोलीस स्टेशनमध्ये दिनाक २६ जानेवारी २०२१ रोजी श्री. सचिन ओटवणेकर यांच्या विरोधात अनुसूचित जाती वा अनुसूचित जनजाली (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ चे कलम १)). भादंवि कलम २९४, ३२३, १०४, १०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भितीने श्री. सचिन ओटवणेकर यांनी पलायन करुन ते फरार झाले आहेत. त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. तरीसुदधा फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यास पोलीस प्रशासन टाळाटाळ का करीत आहे असा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ यांनी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
त्यांनी निवेदनात असे म्हटले आहे की एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणात पोलीसांची व डीवायएसपी सावंतवाडी यांची भूमिका संशयास्पद व बिल्डरधर्जिणी राहिली आहे. वर नमुद प्रकरणी श्री. अरविंद गायकवाड यानी दिनांक ९ जानेवारी २०२१ रोजी ओरोस पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती. त्यादिवशी त्यांना संध्याकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत सहा तास ओरोस पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. ते सरकारी नोकरीत असल्याने एका बिल्डरविरोधात तक्रार देणे त्यांना किती महागात पडू शकते याबाबत पोलीसांनी त्यांना भिती दाखवली. श्री.सचिन ओटवणेकर यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर सर्वत्र वायरल करून बिल्डरची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात आयटी ऍक्टनुसार बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी धमकी सुद्धा पोलीसांकडून देण्यात आली, मात्र सहा तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवल्यानंतर एफआयआर दाखल करणे दुरच राहिले पोलीसांनी साधी एनसी देखील दाखल करुन घेतली नाही. दिनांक १२ जानेवारी २०२१ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक औरोस यांनी संघयाकाळी संबंधित बिल्डरला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले आणि तक्रारदाराला बिल्डरसोबत तडजोड करण्याची ऑफर दिली. त्यानंतरही तक्रारदार बिल्डरसोबत तडजोड करण्यास तयार होत नसल्याने पोलीसांनी स्वतःच टाईप केलेल्या जबाबावर तक्रारदाराची जबरदस्ती सही घेतली. त्या जबाबाच्या आधारावर एनसी दाखल करून घेतली परंतु बिल्डरवर एंट्रासिटीचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणुन ओरोस पोलीस स्टेशन व डीवायएसपी सावतवाडी यांनी पुरेपुर प्रयत्न केलेत. शेवटी तक्रारदारांची पत्नी असलेल्या सौ. शारदा अरविंद गायकवाड यांनी प्रजासताक दिनी उपोषणाचा इशारा दिला. त्यामुळे पोलीसांनी नाईलाजास्तव २६ जानेवारी दिवशी आरोपी विरोधात ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा लागला.असा आरोप निवेदनात केला आहे.
आरोपी सचिन ओटवणेकर गुन्हा दाखल होताच फरार होऊन लपुन बसला आहे. आज गुन्हा दाखल होऊन तीन दिवस उलटले आणि जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला तरी आरोपीला अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत. डीवायएसपी सावंतवाडी यांच्याशी आरोपीचे असलेले लागेबांधे विचारात घेता पोलीस प्रशासन त्याला जाणीवपूर्वक अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारे एखादा आरोपी चर्मकार बांधवाला माराहाण करून गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलीसांच्या कृपाशीर्वादाने मोकाट फिरत असेल तर एकंदरीतच समाजात एक चुकीचा पायंडा पडण्याची शक्यता आहे. भविष्यात अटकेची भीतीच राहिली नाही तर कुणीही सवर्ण समाजातील व्यक्ती ऊठसूठ दलित समाजातील व्यक्तीला मारहाण करायला मागेपुढे पाहणार नाहीत. त्यासाठीच फरार आरोपी सचिन ओटवणेकर याला तात्काळ अटक करणे सामाजिकदृष्टीने तितकेच महत्वाचे आहे. तरी वर नमूद प्रकरणी आपण स्वतः जातीनिशी लक्ष घालुन पुढील ४८तासात आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला अटक करावी. ऍट्रॉसिटी केसमधील आरोपी असलेल्या सचिन ओटवणेकर याला अटक करण्यास पोलीसांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्यास त्याचा निषेधकरण्यासाठी संवैधानिक पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर जिल्हाभरातील चर्मकार बांधवांचा मोर्चा काढण्यात येईल, याची आपण नोंद घ्यावी असा इशारा निवेदनातून दीला आहे.
*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

