रिंगरोडच्या भूसंपादनासाठी आवश्यक असलेले अंदाजे ४० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यासाठी नगरविकासमंत्र्याकडे प्रयत्न करू; आ.दीपक केसरकर

▪️सावंतवाडी शहरातून प्रस्तावित असलेल्या रिंग रोड मार्गे जावा; पालिकेतील बैठकीत एकमत

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : निलेश लाड

🎴सावंतवाडी,दि.०१: संकेश्वर-बांदा आणि संकेश्वर-रेडी हा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातून प्रस्तावित असलेल्या रिंग रोड मार्गे जावा असे एकमत आज पालिकेत पार पडलेल्या आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक व व्यापाऱ्यांच्या उपस्थितीतील बैठकीत झाले. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी आवश्यक असलेले अंदाजे ४० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यासाठी नगरविकासमंत्र्याकडे प्रयत्न करू, असे आश्वासनही आ.  केसरकर यांनी यावेळी दिले. मात्र, शहरातील प्रस्तावित रिंग रोड सद्यस्थितीत दोन ठिकाणी तुटलेला आहे, त्या ठिकाणी इमारती उभ्या करण्यास परवानगी आहे, तर काही लोक रिंगरोड विरोधात कोर्टात गेले आहेत, त्यामुळे या लोकांचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे आहे असे नगराध्यक्ष संजू परब यांनी स्पष्ट केले.

संकेश्वर येथून बांदा असा होणारा दोन हजार कोटी रुपयांचा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की, बावळट मार्गे बांदा शहराला जोडणार याबाबत तर्क-वितर्क आहेत. सदरचा महामार्ग हा सावंतवाडी शहरातूनच जावा अशी मागणी शहरवाशीयांमधून होत आहे, असे नगरसेवकांनी सांगितले.

झाराप-पत्रादेवी बायपास हा शहराबाहेरून गेल्याने आधीच शहराचे मोठे नुकसान झाले असल्याने संकेश्वर-बांदा, किंवा रेडी हा महामार्ग शहरातून जावा अशी मागणी जोर धरू लागली आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

आमदार दीपक केसरकर यांनी हा मार्ग शहरातून प्रस्तावित असलेल्या रिंग रोड मार्गे जावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव केला होता. याच पार्श्वभूमीवर आमदार केसरकर यांनी आज नगरपालिकेमध्ये सत्ताधार्‍यांसोबत बैठक घेतली.

यावेळी व्यापारी वर्गासह नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, उदय नाईक, बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, नगरसेविका दिपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, शुभांगी सुकी, भारती मोरे, दिपाली सावंत, माधुरी वाडकर आदी उपस्थित होते.

या बैठकीच्या सुरुवातीला भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावले यांनी आमदार दीपक केसरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर झालेल्या चर्चेत केसरकर म्हणाले, संकेश्वर ते बांदा या राष्ट्रीय महामार्गाचे शहरातील बुर्डी पूल पर्यंत डीपीआर पूर्ण झाला आहे. त्यानंतर बुर्डी पुल ते रेडी या दुसऱ्या टप्प्याचे डीपीआर होणार आहे. मात्र, संकेश्वर ते बांदा जाणारा हा मार्ग शहराबाहेरून गेलेल्या रिंग रोड मार्गे जावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, त्यासाठी आवश्यक भुसंपादन नगरपालिकेने करुन जागा ताब्यात घ्यावी त्यासाठी लागणारे चाळीस कोटी रुपये आपण उपलब्ध करुन देतो.

यावेळी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले, सदरचा रोड हा दोन ठिकाणी तुटलेला आहे. त्याठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्याठिकाणी घरे बांधण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्या दोन ठिकाणचा रोड जोडणे आवश्यक आहे. हा मार्ग शहरातुनच गेला पाहीजे या मताचे आम्ही आहोत. त्यात कुठलेही राजकारण होणार नाही. मात्र, जे कोण न्यायालयात गेले आहेत, त्यांच्याशी चर्चा होणे आवश्यक आहे, ते लोक तयार असल्यास हे काम होऊ शकते.

सदर लोकांची लवकरच बैठक बोलावून घ्या व त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. त्यांची समजुत घालुन तसेच टीडीआर माध्यमातून नुकसान भरपाई दिल्यास ते ऐकुन घेणार का ते पहा आवश्यक असल्यास मी या बैठकीला उपस्थित राहीन अशा सुचना मुख्याधिकारी यांना आमदार केसरकर यांनी दिल्या. महामार्ग हा शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यात कुठलाही वादाचा विषय होता कामा नये. काही लोक या महामार्ग दुसरी कडून मिळण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्ग रूपांतर होऊ शकते त्यामुळे अन्य कुठल्याही मार्गाने हा महामार्ग होणार नाही असेही श्री. केसरकर म्हणाले.

यावेळी बुर्डी पुल ते रेडी हा मार्ग कसा बसणार असा प्रश्न ग्रामपंचायत सदस्य हेमंत मराठे यांनी केला. हा महामार्ग बांदा पासून मडूरा तळवणे मार्गे आरोंदा असा नेण्याचा घाट आहे. असे झाल्यास मळगाव, निरवडे, न्हावेली, मळेवाड या गावातील लोक त्यांना आंदोलन करू त्यामुळे हा मार्ग निरवडे मळेवाड असा होण्यासाठी आपण प्रयत्न करा असे सांगितले. तळवणे मार्ग मायनिंगसाठी तर बावळट मार्ग दारूच्या वाहतूकीसाठी ठरेल असे श्री.मराठे म्हणाले.

यावेळी शहरातील विविध विषय केसरकर यांनी जाणून घेतले. यावेळी संदेश परब, बाळ बोर्डेकर, जगदीश मांजरेकर, सतीश पाटणकर, डी.के. सावंत, बंटी पुरोहित, निशांत तोरस्कर, राजन नाईक, पुंडलिक दळवी, संजय शिरोडकर, महेश कुमठेकर, साईनाथ हवालदार, राजन शृंगारे तसेच व्यापारी उपस्थित होते. त्यांनीही सावंतवाडी शहरातून संकेश्वर बांदा किंवा रेडी जाणारा रस्ता जावा अशी मागणी केली.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!