कृषिवेंगुर्लेशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

रेडी खाडीतील वाळू माफियांचा हैदोस व मायनिंग कंपनीच्या विरोधातील उपोषणाला जिल्हाप्रशासन व जिल्हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांच्याकडून आश्वासनांचा पाऊस..

▪️एक महिन्यात आश्वासनाची कायदेशीर पूर्तता न झाल्यास, तात्पुरते खंडित केलेले बेमुदत उपोषण संस्थेच्या माध्यमातून पुन्हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांच्या विरोधात बेमुदत आत्मक्लेश उपोषण करणार; सह सचिव विश्वनाथ शेलटे व शेतकरी मनोहर बुज्जी

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : शुभम वैद्य

🎴वेंगुर्ले,दि.०१: भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, सिंधुदुर्ग विभागाच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील, रेडीतील शेतकरी, ग्रामस्थ व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील विविध संवेदनशील विषयाकडे शासनाचे लक्ष वेधून नियमनुकूल कारवाई व्हावी याकरिता दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयांचे समोर केले होते. सदर उपोषणात, वाळू माफियांकडून करण्यात येणार बेकायदेशीर वाळू उपसा थांबवून कठोर कारवाई व्हावी , लीज मुक्त जमिनीतील शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करावा , मायनिंग खाणीतील अनावश्यक गोड्या पाण्याचा उपसा तात्काळ थांबवावा, तसेच पाण्याअभावी शेतकऱ्यांचे झालेली माड मर बाबत व मे. गोगटे मिनरल्स कंपनीने खनिजयुक्त चिखल शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनीत सोडल्याने नापीक झालेल्या शेतजमिनीची नुकसानीभरपाई मिळण्या बाबत बेमुदत उपोषण  करण्यात आले होते.

संस्थेच्या वतीने करण्यात आलेला बेमुदत उपोषणातील सर्व विषय हे जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाच्या अखत्यारीत येत असताना, त्यांनी स्वतःहून याविषयावर कारवाई करणे गरजेचे होते. परंतु तसे न केल्याने शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना उपोषण करण्याची वेळ आली, ही गंभीरबाब सिंधुदुर्गातील महसूल विभागाच्या कर्तव्य तत्परतेवर नक्कीच शंखा उपस्थित केल्यासारखी आहे. तरीही उपोषणातील काही मुद्यांचे विषय जिल्हा खनिकर्म विभागाकडे  दिले गेले. सदर उपोषणातील मुद्यांचे  स्पष्टीकरण देण्याकरिता खनिकर्म विभागाच्यावतीने श्री अजित पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. दुर्दैवाने हे जिल्हा खनिकर्म अधिकारी अगोदर बेकायदेशीर काम करणाऱ्या खाण कंपन्यांचेच कर्मचारी होते अशी माहिती प्राप्त झालेली असून ते पुरेपूर खाण कंपन्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत असे त्यांच्या वर्तणुकीवरून दिसून येत आहे. तसेच शेतकरी व संस्थेच्या वतीने श्री. पाटील यांना दिनांक २७ जानेवारी रोजी देण्यात आलेल्या निवेदनावर, दिनांक २९ जानेवारी रोजी श्री. पाटील यांनी सदर उपोषणातील मुद्यांचे स्पष्टीकरण हे आपले सोईनुसार कंपनीला सहकार्य करण्याच्या उद्देशाने तीन वेळा आमच्या समक्ष बदलून देण्यात आले. आम्हाला श्री. पाटील यांनी स्पष्टीकरण देण्यास सकाळी ११.३० पासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत नाहक कार्यालयात बसवून ठेवल्याने निरीक्षक श्याम लाखे आमच्यावर रागाने चिडून श्री. पाटील यांना बोलले की, यांचं आता बस करा, आम्हाला घरी जायचं आहे, त्यांना सोमवार मंगळवारी बोलवा, असे उद्धटपणे मुजोर वर्तन करून आम्हा उपोषणकर्ते शेतकऱ्यांना कार्यालयातून हकलविण्याचा प्रयत्न केला असे शेतकरी मनोहर बुज्जी यांनी सांगितले.

रेडी येथील बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनीत ८५१५ ह्या फेरफार प्रमाणे बी.म. गोगटे यांच्या नावाचा लिझ असल्याचा बोजा आहे. सदर व्यक्तीस देवाज्ञा होऊन २० वर्षे झाली, तरीही त्यांच्या नावाचा बेकायदेशीर बोजा कमी करण्याविषयी कायदेशीर अंमल झालेला नाही. या संबंधित अधिकाऱ्यांना सदर विषयातील सर्व माहिती व कागदपत्र उपलब्ध असूनही हा बेकायदेशीर बोजा कमी करण्यासंदर्भात, तसेच  शेतकऱ्यांची मागणी असूनही महसूल विभागाला लेखी सूचना करण्यास श्री.अजित पाटील हे बुद्धिपुरस्सर टाळाटाळ करीत आहेत व याबाबत वरिष्ठांना पत्रव्यवहार करून, माहिती घेऊन सांगतो अशी उत्तरे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करून हेतुपुरस्सर विलंब करीत आहेत.

तसेच रेडी येथील न्यू इंडिया मायनिंग कार्पोरेशन प्रा. ली, रेडी. यांची लिझही २२ एप्रिल २०२० रोजी संपली असून, त्यांना अगोदरच ५० वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे MMDR २०१५ च्या सुधारित कायद्याचा तरतुदी प्रमाणे त्यांना पुन्हा लीज ही त्यांनाच मिळणार याची शक्यता नसतांना व त्यांना लीज नूतनीकरणाचा कोणताही आदेश अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नसताना, तसेच त्यानी लीज नूतनीकरणाचा FORM–K अद्याप पर्यंत भरून लीज नुतनीकरण केलेले नसताना, याबाबत कार्यवाही सुरु आहे, असे धांदात खोडसाळ उत्तरे देऊन खनिकर्म अधिकारी श्री. पाटील हे कंपनीला पाठीशी घालत आहेत. याबाबत शेतकऱ्यांच्या  जमिनीवर हा अनावश्यक बोजा असल्यामुळे त्यांचे होत असलेले आर्थिक नुकसान हे श्री.अजित पाटील हे आपल्या वेतनातून देणार आहेत काय? असा संतप्त सवाल रेडीतील बाधित शेतकरी विचारात आहेत. याबाबत केवळ कंपनीचा बोजा असल्यामुळे होत असणारे शेतकरी व जमीनदारांचे नुकसान हे खनिकर्म निधीतून द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. तरी याबाबत भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या मार्फतीने रेडीतील बाधित शेतकरी, ग्रामस्थ व पदाधिकारी हे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना समक्ष निवेदन देऊन त्यांची भेट घेणार असून रेडीतील खाण कंपन्यांकडून होणाऱ्या अन्याया विरुद्ध दाद मागणार आहेत. असे संस्थेचे सह सचिव विश्वनाथ शेलटे व शेतकरी मनोहर बुज्जी यांनी सांगितले.

दिनांक २६ जानेवारीच्या उपोषणास समर्थन देण्याकरिता बसलेले सामाजिक कार्यकर्ते व वरिष्ठ सीए श्री. साईप्रसाद कल्याणकर यांनी सदर गंभीर प्रकरणात प्रशासकीय अधिकाऱ्यांना जी कर्तव्य दिलेली असतात, त्यात कसूर करणे याला भ्रष्टाचार म्हणतात. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा कलम २४ प्रमाणे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कर्तव्यात वारंवार कसूर केल्यास मोक्का कायद्याचे कलम ३, ४ प्रमाणे त्यांचेवर दंडात्मक कारवाई करून अंकुश ठेवावा लागणार आहे असे मत मांडलेले आहे.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!