करियरकोकणक्रीडारत्नागिरीसामाजिक

ओम स्पोर्ट्स अकॅडमी चिपळूणतर्फे कबड्डीचे प्रशिक्षण शिबीर संपन्न..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.०१: राष्ट्रीय प्रशिक्षक आणि चिपळूणचे सुपुत्र श्री. संतोष  शिर्के यांच्या ओम स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने कोलेखाजन चिपळूण येथे कबड्डीच्या सराव शिबिराचे आयोजन गेले १० दिवस करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये खेळाडूंना कबड्डीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले. महाराष्ट्रातील अनेक राष्ट्रीय प्रशिक्षकांनी आपल्या अनुभवाचा फायदा अनेक खेळाडूंना दिला. सदर शिबिराच्या सांगता सोहळा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य आणि मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. प्रतापराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव, राष्ट्रीय प्रशिक्षक व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन पंच मंडळ सदस्य श्री. मालोजी भोसले, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहसचिव व राष्ट्रीय प्रशिक्षक आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे तांत्रिक समिती सदस्य श्री. राजेंद्र आंदेकर, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहसचिव राष्ट्रीय प्रशिक्षक आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे प्रशिक्षण समिती सदस्य श्री. योगेश यादव, राष्ट्रीय प्रशिक्षक आणि महाराष्ट्र राज्य पंचमंडळ सदस्य श्री. संदीप पायगुडे, शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन नियामक मंडळ सदस्य सौ. शीतल मारणे, डॉ. डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी फिजिकल डायरेक्टर श्री. मिलिंद जाधव, एन.आय. एसचे प्रशिक्षक आणि राष्ट्रीय खेळाडू श्री. कुलभूषण कुलकर्णी, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे संयुक्त कार्यवाह श्री. विकास पवार, राष्ट्रीय प्रशिक्षक श्री. सतीश गायकवाड, महाराष्ट्र संघाचे माजी संघ व्यवस्थापक श्री. संतोष शिंदे, चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यवाह श्री. रमाकांत सकपाळ, माजी कबड्डी खेळाडू श्री. चंद्रकांत कदम, श्री.रतन कदम, युवा सेनेचे शहरप्रमुख श्री. निहार कोवळे, प्रतिथयश वकील श्री.विश्वजीत यादव, श्री. परेश जानवलकर, श्री. सौरभ नाटूस्कर, श्री. रोहित सपकाळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

सदर शिबिराला रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सचिन  कदम, महाराष्ट्र राज्याचा कर्णधार श्री. स्वप्नील शिंदे, चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह श्री. विलास गुजर, राष्ट्रीय पंच आणि महाराष्ट्र राज्य पंच मंडळ सदस्य श्री. नितीन कदम, श्री. मंगेश पवार, राष्ट्रीय पंच आणि प्रो कबड्डीच्या पहिल्या २ सेशनमध्ये दर्जेदार कामगिरी करणाऱ्या सौ. सायराबानू शेख, श्री. जितेंद्र शिंदे आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.

संपूर्ण शिबिरामध्ये महाराष्ट्रातील ५० शिबिरार्थी सहभागी झाले होते. सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री. रणवीर कदम , श्री. सुदेश सावंत, श्री. विकी साळवी, श्री. संग्राम चव्हाण, श्री. निलेश कदम, श्री. आकाश शिंदे, सौ.गायत्री शिर्के, सौ.आशा सावंत, सौ. वैभवी कदम, सौ. कल्याणी साळवी यांनी विशेष सहकार्य केले या सर्वांचा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.

सदर शिबिराच्या उद्घाटन आणि सांगता सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री. अमोल टाकळे यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे ओम स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख राष्ट्रीय प्रशिक्षक श्री. संतोष शिर्के यांनी आभार मानले.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!