मुंबई-गोवा महामार्गाच्या कंत्राटदाराला कुडाळ या नावाची ॲलर्जी का; प्रा.अरुण मर्गज यांचा सवाल
▪️गोव्याच्या दिशेने महामार्गावर लावलेले गार्ड स्टोन पहाता कंत्राटदाराला कुडाळ शहराचे वावडे असल्याचे चित्र..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.३१: राष्ट्रीय महामार्गाचा विचार करता महामार्गावर जे दिशादर्शक व स्थलदर्शक फलक लावले जातात, त्यामध्ये तालुका, शहर किंवा जिल्हा शहर किंवा विशेष शहर असेल तर ते शहर किती किलोमीटर दूर आहे? किंवा त्या शहराकडे जाणारा बाण दाखवून तसे सूचित केले जाते. मात्र, कणकवली वरून सावंतवाडीच्या दिशेने येताना बांबर्डे, पावशी याठिकाणी जे मैलाचे दगड किंवा दिशादर्शक लावलेले आहेत, त्यामध्ये कुडाळ शहराचे नाव अजाणतेपणे की, जाणून बुजून दुर्लक्षित केल्याचे दिसून येत आहे. पावशी, बांबर्डे येथे असणाऱ्या मैलांच्या दगडावर बिबवणे नऊ किलोमीटर, बिबवणे सहा किमी (अर्थात बिबवणे वासियांची क्षमा मागून) दर्शविणारे फलक आहेत. वास्तविक पाहता बिबवणे पेक्षा कुडाळ शहर हे तालुका शहर असल्यामुळे त्या शहराचा नामनिर्देश फलकावर असणे आवश्यक आहे. की, जे या भागात अपरिचित आहेत; पण तसे न होता कुडाळ रेल्वे स्टेशन कडे, किंवा पान बाजार असे फलक लावून कुडाळ शहराचं नाव हे दुर्लक्षित केल्याचं किंवा त्याच्याकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. आता भंगसाळ फुलाचा विचार करता तेथील फलकावर पान बाजार, हा दिशादर्शक राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाचा नसून तर कुडाळ शहराकडे हा दिशादर्शक नाम फलक असणे गरजेचे होते. कुडाळ रेल्वेस्टेशन बरोबरच कुडाळ शहर ज्या दिशेला आहे, त्याचा उल्लेख असणे गरजेचं होतं; परंतु कुडाळ रेल्वे स्टेशन कडे, पान बाजाराकडे असे राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आलेले आहेत. यामागचा दिशादर्शक फलक बनवणार यांचा उद्देश मात्र अनाकलनीय आहे. वास्तविक पाहता पानबाजाराचा उल्लेखच हवा असल्यास तो कुडाळ पानबाजाराकडे असं चाललं असतं. कारण महामार्गावरून प्रवास करणाऱ्या परराज्यातील प्रवाशांना पानबाजारापेक्षा कुडाळ समजणे जास्त महत्त्वाचे असते. तसेच महसूल खात्यातून कुठेतरी उचललेली गावांची नावे दिशादर्शक फलकावर चिकटवलेली पाहायला मिळतात. उदाहरणार्थ बांबर्डे हा शब्द चालला असता; परंतु महसूल खात्यामध्ये असलेल्या जुन्या नावांनी महामार्गावर दिशादर्शक फलक लावताना बांबर्डे तर्फ कळसुली, तर पणदुर येथील दिशादर्शक फलकावर घोडगे, पांग्रड ही शेवटची ठिकाण न टाकता मध्येच आवळेगाव (आवळेगावाला विरोध नाही बरं का) अशी गावाचे नाव घेऊन महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अनोळखी व्यक्तींना संभ्रमात टाकण्यामागचा उद्देश मात्र न समजण्याजोगा आहे. वास्तविक पाहता राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या अनोळखी लोकांसाठी दिशादर्शक फलक यामध्ये शेवटच्या ठिकाणाचे किंवा महत्त्वाच्या शहराचे, गावाचे नाव असणे गरजेचे असताना मधल्या कुठल्या गावाची नावे देण्यामागचा उद्देश न समजण्याजोगा आहे. सन्माननीय लोकप्रतिनिधी, सजग असणारे समाजधुरीण या कडे लक्ष देतील का? असे प्राचार्य अरुण मार्ग त्यांनी म्हटले आहे.
*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*
🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊
_*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_
_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_
*🤷🏻♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_