गेली पाच वर्षे कुडाळ भाजी मार्केट भाजी विक्रेत्यांच्या प्रतीक्षेत; शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.३०: शहराला व शरातील प्रत्येक कुटुंबाला लागणारी भाजी माणसांचा अविभाज्य घटक असून भाजीची कुडाळ शहरामध्ये मोठ्याप्रमाणात खप व होलसेल उलाढाल मोठी होत आहे. परंतु गेली ६० वर्षापेक्षा जुने मुख्य बाजारपेठेत भाजी मार्केट आहे. परंतु कुडाळ नगरपंचायतने गेली ५ वर्षे कुडाळचे भाजी मार्केट ओस पाडून ठेवले आहे. त्यामुळे त्या भाजी मार्केटचा आता लोकांना विसर ही पडला की, शहरात भाजी मार्केट आहे. मुख्य बाजारपेठेत व संपूर्ण कुडाळ शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण करून दुतर्फा बसण्यास सत्ताधारी नगरपंचायत भाजी विक्रेत्यांस मुभा देत आहे. मुख्य बाजारपेठेतील भाजी मार्केट संपवून टाकून कुडाळ पोस्ट ऑफिस पासून पेट्रोल पंप पर्यंत रस्त्यावर दोन्ही बाजूने भाजी विक्रेत्यांना बसण्यास काही राज्य मार्गाच्या रस्त्यावर. त्यामुळे सध्या मुख्य बाजारपेठ व पान बाजार पर्यंतची बाजारपेठ ओस पडत चालली आहे. असे दिसून येते. नगरपंचायत सत्ताधार्‍यांनी मुख्य बाजारपेठ संपविण्याचा घाट घातला आहे. ही बाब आता बाजारपेठेतील लोकांच्या लक्षात देखील आलेली आहे. लवकरच भाजी मार्केट बद्दल नगरपंचायतला जाब विचारून निवेदन देणार आहोत. असे शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पोस्ट ऑफिस ते पेट्रोल पंप पर्यंत दुतर्फा भाजी विक्रेत्यांना बसण्यास नगरपंचायत कोणताही अटकाव न करता कर (जकात) ही दामदुप्पट वसूल करत असून त्यांना कुठलीही सोय न करता व भाजी मार्केट उपलब्ध असूनही तसेच वाहतुकीस अडथळा करून कोव्हिडच्या नावाखाली त्यावेळी भाजीवाल्यांना बसविण्यास सुरुवात केली होती आणि ती प्रथा आजपर्यंत, असा पायंडा नगरपंचायतीने घालून दिला.

तसेच गावठी आठवडा बाजार तो ही पोस्ट ऑफिस समोरच सुरू केला. कोव्हिड काळात बंद होता व आता पुन्हा त्याच ठिकाणी सुरू करावयाची तयारी चालू आहे. परंतु निदान गावठी आठवडा बाजार तरी शहरातील जुन्या भाजी मार्केटमध्ये बसवून जुने भाजी मार्केट जीवंत ठेवण्याचे थोडे तरी पुण्यकर्म मुख्य बाजारपेठ वासीयांसाठी करावे. सध्या कुडाळ शहराची स्थिती म्हणजे “आंदळ दळतयं आणि .. .. ….” अशी आहे. याचा फायदा फक्त बिल्डर लॉबीसाठीच आहे. याचा जनतेला व व्यापर्‍यांना खूप त्रास होत असून याचा विचार नगरपंचायत का करत नाही. कुडाळ शहरामध्ये नगरपंचायत झाल्यानंतर शहराचा विकास होईल असे वाटले होते. परंतु अपेक्षित विकास झालेला नाही व कुठेही शिस्तीचा ताळमेळ दिसून येत नाही.

कुडाळ ग्रामपंचायत असताना भाजी मार्केटमध्ये भाजी व्यापारी बसण्यासाठी ग्रामपंचायत सक्ती व कारवाई करत होती. पण या नगरपंचायतने भाजी मार्केट बद्दल आज पर्यंत भाजीचा “ब्र”सुद्धा काढला नाही. याची  सुज्ञ ग्रामस्थ या विषयी चर्चा करत आहेत. असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. शिरसाट यांनी म्हटले आहे.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*

*🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️*

*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_*

*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_

*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

        *🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!