आपत्कालीनवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

करूळ घाटात पत्र्याने भरलेल्या ट्रकला अपघात..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : वैभववाडी

🎴वैभववाडी,दि.३०: सिमेंट पत्र्याने भरलेल्या ट्रकला करूळ घाटात अपघात झाला. ट्रकचा टायर फुटल्याने हा अपघात झाला आहे. दरीकडील बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाला ट्रक जोरदार धडकल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. तर ट्रकमधील पत्रे दरीत कोसळले आहेत. या अपघातात ट्रक चालकाचा दहा वर्षाचा मुलगा बालबाल बचावला आहे. मात्र त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे. दोन्ही जखमींना वैभववाडी पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत. हि घटना सकाळी ९ च्या सुमारास घडली.

सिमेंटचे पत्रे घेऊन ट्रक पुणेहुन तरेळेकडे जात होता. करूळ घाटात धोक्याच्या खिंडीनजीक ट्रक आला असता ट्रकचा डाव्या बाजूचा पुढील टायर फुटला. व ट्रक दरीकडे असलेल्या आंब्याच्या झाडाला आदळला. यात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. तर सर्व पत्रे दरीत कोसळले आहेत. पोलीस कॉन्स्टेबल श्री. पडवळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. ट्रकमधील जखमींना त्यांनी करूळ चे ग्रामस्थ संदीप मोरे, भूषण पडवळ यांच्या मदतीने बाहेर काढत उपचारासाठी हलविले आहे.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!