निगुडे ग्रामपंचायत येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : बांदा
🎴बांदा,दि.२९: ग्रामपंचायत निगुडे या ठिकाणी आज सायंकाळी ०३:०० वाजता हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सावंतवाडी पंचायत समिती सभापती श्रीमती मानसी धुरी व इन्सुली जिल्हा परिषद सदस्य श्रीमती उन्नती धुरी होते. यावेळी निगुडे लोकनियुक्त सरपंच समीर गावडे, ग्रामसेवक श्रीमती तनवी गवस, तलाठी श्रीमती भाग्यश्रीला शिंदे, ग्रामपंचायत सदस्य समीक्षा गावडे, लक्ष्मी दळवी, ईशा तुळसकर यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रियांका गावडे यांनी केले. तर मान्यवर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सरपंच यांनी सभापती श्रीमती मानसी धुरी व इन्सुली जिल्हा परिषद सदस्य श्रीमती उन्नती धुरी यांना पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत केले.
“प्लास्टिकचा वापर बंद करा, कापडी पिशव्या वापरा” हा संदेश घेऊन ग्रामपंचायतीने एक चांगला उपक्रम सुहासिनी समोर ठेवला असे प्रतिपादन सभापती श्रीमती मानसी धुरी यांनी केले. तसेच महिलांनी सक्षम व प्रभावीपणे सामाजिक क्षेत्रात कार्य करा आज अनेक क्षेत्रात महिलांना मोठ्या प्रमाणात आरक्षण आहे. त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि आपल्या गावासाठी एक आदर्श महिला म्हणून काम करा असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य श्रीमती उन्नती धुरी यांनी केले. यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. निगुडे ग्रामपंचायतीसाठी सभागृहाची आवश्यकता आहे. तरी सभागृहासाठी आवश्यक तो निधी आपण उपलब्ध करून द्यावा अशी मागणी लोकनियुक्त सरपंच समीर गावडे यांनी सभापती श्रीमती मानसी धुरी व इन्सुली जिल्हा परिषद सदस्या श्रीमती उन्नती धुरी यांच्याकडे केली. आम्ही यासाठी योग्य तो पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी सरपंचांना दिली. आभार प्रदर्शन निगुडे सरपंच यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_