कोकणक्राइमसामाजिकसिंधुदुर्ग

ओट्रा इनफ्रास्ट्रक्चरचे संचालक सचिन ओटवणेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालायाने फेटाळला..

▪️ रानबांबुळी येथील अरविंद गायकवाड यांना अश्लील भाषेत शिवीगाळ व मारझोड केल्याप्रकरणी ओरोस पोलीस स्टेशनमध्ये ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा झाला होता दाखल..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह

🎴ओरोस,दि.२९: मे. ओट्रा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीचे संचालक सचिन ओटवणेकर यांनी रानबांबुळी येथे राहणाऱ्या श्री. अरविंद महादेव गायकवाड यांना दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी अश्लील शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक २६ जानेवारी २०२१ रोजी श्री. सचिन ओटवणेकर यांच्याविरोधात अनुसुचित जाती वा अनुसूचित जनजाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ चे कलम ३(१)(आर), भादंवि कलम २९४, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा घडलेल्या दिवशी श्री. गायकवाड हे फ्लॅटच्या परिसरात गेले असता बिल्डर सचिन ओटवणेकर यांनी त्यांना दांडगाई करायला सुरुवात केली. त्यांना धक्के मारत प्रॉपर्टीतून बाहेर पडण्यासाठी धमकी दिली. त्यांना सर्वांसमक्ष आई बहिणीवरून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यांचा चारचौघांदेखत पाणउतारा केला. त्यांच्या अंगावरचा शर्ट फाडला आणि त्यांना तिथेच मारझोड करायला सुरुवात केली. त्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यास अडथळे निर्माण केले. संबंधित बिल्डरविरोधात श्री. गायकवाड यांनी दिनांक ९ जानेवारी २०२१ रोजी ओरोस पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. मात्र, बिल्डरविरोधात ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत होते. पोलीसांच्या या भुमिकेविरोधात तक्रारदार यांच्या पत्नी सौ. शारदा अरविंद गायकवाड यांनी प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडल्यानंतर पोलीसांच्या हालचालींना वेग आला. उपोषणाच्या ठिकाणी आमदार वैभव नाईक यांनी ओरोस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. भोसले यांना फैलावर घेतले. एका चर्मकार समाजातील व्यक्तीला अश्लील शिवीगाळ व मारहाण केल्यानंतर ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यास का टाळाटाळ होत आहे, याबाबत जाब विचारला. पालकमंत्री उदय सामंत यांनी एसपी व डीवायएसपी सावंतवाडी यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. दरम्यानच्या काळात ओरोस पोलीस स्टेशनमध्ये ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी श्री.ओटवणेकर यांनी आपल्याला अटक होवू नये म्हणुन पळ काढला आणि जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, हा अर्ज जिल्हा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश श्री. पी.आर. कदम यांनी फेटाळून लावला आहे. या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे श्री.ओटवणेकर यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. आता त्यांना कोणत्याही क्षणी पोलीस अटक करू शकतात.

_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_

💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..

_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻‍♂️*_

*💁🏻‍♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻‍♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!