कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑आमदार नीलेश राणेंचे पोलीस अधीक्षकांना पत्र

*🛑आमदार नीलेश राणेंचे पोलीस अधीक्षकांना पत्र*

 

*🛑अनधिकृत वास्तव्यास असलेल्या परप्रांतियांची चौकशी करून कारवाई करा!*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- ०३:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृत वास्तव्यास असलेल्या परप्रांतियांची चौकशी करून कारवाई व्हावी, असे पत्र आमदार नीलेश राणे यांनी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.

दरम्यान, आमदार नीलेश राणे यांचे पत्र प्राप्त होताच, पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाईचा बडगा उगारला. मालवण पोलीस ठाण्यातर्फे तात्काळ कारवाई करत ३६ परप्रांतियांची आधारकार्डस् सत्यता पडताळणीला पाठविली आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली. काही परप्रांतीय व्यक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृत वास्तव्य करून येथे व्यवसायाच्या नावाखाली अनेक गैरप्रकार करत आहेत यात गुन्हेगारी असलेल्या समाजातील मुस्लिम व्यक्तीची संख्या जास्त आहे. अशांकडे वास्तव्याचे पुरावे नाहीत, बनावट आधारकार्ड व इतर तत्सम कागदपत्रे बनवून, जुन्या व नोंदणी नसलेल्या गाड्यांचा वापर होत आहे. अशा लोकांचा वावर हा जिल्ह्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे, असे त्यांनी म्हटले आहे

या परप्रांतियांच्या कागदपत्रांची त्वरित चौकशी करून अनधिकृत राहणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर जिल्हयात प्रतिबंधित करण्याची कार्यवाही करावी. या लोकांनी वास्तव्याची कागदपत्रे आधार कार्ड, रेशनकार्ड कोणत्या कागदपत्रांच्या आधारे बनविली, याची शहानिशा करून चौकशी व्हावी. त्यांच्या वापरातील गाड्यांचीही तपासणी करून त्या जप्त कराव्यात. त्यांच्या राहत्या घरांची झडती घेत तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

शासनाने गांभीर्य लक्षात घेऊन, त्वरित कार्यवाही करावी व केलेल्या कारवाईबाबत कळवावे, असे पत्र आमदार राणेंनी पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. त्यानुसार मालवण पोलिसांकडून त्वरित कारवाई करत ३६ परप्रांतियांची आधारकार्ड पडताळणीसाठी पाठविली आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!