न्यू सबीनीसवाडा येथील मॉर्डन कॉलनीच्या नाम फलकाचे अनावरण उत्साहात..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.२९: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी न्यू सबतीसनाडा डोगरेपाणंद येथील रहिवाशांनी नव्यानेच स्थापन केलेल्या ‘मॉडर्न कॉलनीच्या नामफलकाचे अनावरण मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात कॉलनीतील जेष्ठ माजी सैनिक सुभेदार रामा मनोहर गावडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीतावर कॉलनीचे अध्यक्ष सुभेदार लक्ष्मण राणे, सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी श्रीम, कल्पना बोडके, माजी केंद्रप्रमुख गजानन सावंत, राणी पार्वतीदेवी हायस्कुलचे मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील, कॉलनीचे सचिव सूर्यकांत सांगेलकर, कळसुलकर प्राथमिक शाळा मुख्याध्यापक प्रदिप सावंत, प्रा. रमाकांत गावडे, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताकि सचिव श्री. सुर्यकांत सांगेलकर यांनी केले. यात कॉलनी स्थापन करण्यामागचे उद्देश व महत्व पटवून दिले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष माजी सुभेदार लक्ष्मण राणे माजी सैनीक, गजानन गावडे यांनी केले यावेळी गुरूनाथ सावंत, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, माजी मुख्याध्यापक राजाराम बोडके, बॅंक अधिकारी श्री. अजीत बोडके यांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर माजी केंद्रप्रमुख श्री. गजानन सावंत राणी पार्वतीदेवी हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब ढोकरे पाटील, गटशिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना बोडके यांनी मार्गदर्शनपर भाषण करीत कॉलनीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना सुभेदार रामा गावडे यांनी कॉलनीच्या माध्यमातून सहजीवन जगत एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे आव्हान रहिवाशांना केले प्रत्येक माणसाने समाजाप्रती सेवाभावी वृत्तीने वागत एकमेकांच्या आधाराने जीवनाचा आनंददायी प्रवास करावा, वाढते आजार रोग, राही, बदलते पर्यावरण, बदलती जीवनशैली या सार्यांची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे, सावंतवाडीतील एक आदर्श काॅलनी असा नावलौकिक मिळण्यासाठी या कॉलनीतील रहिवाशांनी शैक्षणिक, क्रीडा विषयक, सांस्कृतिक, समाज प्रबोधन पर अनेक उपक्रम राबविण्याचा सूचना देत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कॉलनीतील एकूण चोवीस बंगले आहेत प्रत्येक मालकाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पानवळ कॉलेजचे प्राध्यापक रमाकांत गावडे यांनी केले तर आभार प्रदीप सावंत यांनी मानले.
*_🔥आम्ही आपल्याला देऊ बारा लाखात घर..🔥_*
⚡आपल्याला हक्काचे घर🏠 हवे आहे? आपण घराच्या🏡 शोधात आहात? आपल्याकडे जमवलेली पुंजी💰 कमी पडत आहे? निराश होऊ नका!😊
*💫सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर आम्ही आपल्या देऊ बारा लाखात साडे पाचशे स्क्वेअर फुट सदनिका, तसेच सावंतवाडी शहरात व शहराच्या आसपास एन ए प्लॉट उपलब्ध..🤝*
🙅🏻♂️कोणतीही कायदेशीर कटकट नाही. सगळे व्यवहार पारदर्शी!💥
*😊व्यवहार पूर्ण होईपर्यंत व ताबा मिळेपर्यंत आम्ही देणार आहोत सर्व प्रकारची मदत..🙌*
💫चला तर मग! आपले स्वप्न सत्यात उतरवा..⚡
_*🤷🏻♂️संपर्क : सीताराम गावडे*_
_*संपादक कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल,*_
न्यू सबनिसवाडा, बिरोडकरटेंब, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
_*🙋🏻♂️मोबाईल ⬇️*_
_*📱8484827993*_
_*📱9423304856*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

