कुणकेरी येथील प्रसिद्ध हुडोत्सव १९ मार्चला
सावंतवाडी, दि.२७: कुणकेरी येथील प्रसिद्ध हुडोत्सव १९ मार्चलाहोणार आहे. याबाबतची माहिती देवस्थान समितीच्या माध्यमातून देण्यात आली आहे. या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर या हुडोत्सवाचे आयोजन करण्यात येते. १०० फूट असलेल्या हुड्यावर चढलेल्या अवसाराला दगड मारण्यासाठी हजारो भाविक त्या ठिकाणी उपस्थित राहतात. ज्याच्या कोणाचा दगड बसेल त्याला त्याची मनोकामना पूर्ण होते अशी आख्यायिका आहे. त्याचबरोबर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे या हुडोत्सवाला मोठे महत्त्व आहे.

