कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये राज्यभाषा मराठी गौरव दिन उत्साहात साजरा
कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये राज्यभाषा मराठी गौरव दिन उत्साहात साजरा
सावंतवाडी:
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय,सावंतवाडी प्रशालेमध्ये 27 फेब्रुवारी 2025 रोजी कविवर्य वि.वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) जन्मदिन निमित्त राज्यभाषा मराठी गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून, व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी भाषा प्रमुख श्रीमती एम.एम.कदम यांनी केले. यानंतर प्रशालेतील इयत्ता पाचवी ते अकरावी तील विद्यार्थ्यांनी राज्यभाषा मराठी गौरव दिनानिमित्त मराठी दिनाचे भाषणे, समूहगीत गायन, समूहनृत्य सादर केले. तसेच प्रशालेचे शिक्षक प्रमुख वक्ते श्री सुनील जंगम यांनी मराठी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांना आपल्या वक्तव्यातून सांगितले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले श्रीमती एस.एस.चव्हाण यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जीवनाविषयी तसेच राज्यभाषा मराठीचे महत्व विद्यार्थ्यांना आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले.तसेच प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती जी.एस.सावंत यांनी मराठी दिनाचे औचित्य साधून मराठीचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेतील कलाशिक्षक श्री केदार टेमकर यांनी छत्रपती शिवजयंती निमित्त साकारलेले शिवछत्रपती व त्यांचे मावळे अप्रतिम रांगोळी कले निमित्त प्रशालेचे उच्च माध्यमिक विभाग प्रमुख श्री यु.आर.पाटील यांनी कला शिक्षक श्री केदार टेमकर यांना रोख रक्कम देऊन गौरविले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी श्रीमती एस.एस.चव्हाण, प्रमुख वक्ते श्री सुनील जंगम, मराठी भाषा समिती प्रमुख श्रीमती एम.एम.कदम, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती जी.एस.सावंत, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख श्री यु.आर.पाटील, प्रशालेचे शिक्षक श्री पी.बी.बागुल, शिक्षिका श्रीमती एन.एन.मुंज उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला प्रशालेतील सर्व शिक्षक व प्रशालेचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील विद्यार्थिनी कु.सई नाटेकर व कु.दिव्या मेस्त्री यांनी केले तर प्रशालेचे शिक्षक श्री पी.बी.बागुल यांनी सर्व उपस्थित आमचे आभार मानले.

