🛑 वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकची दुचाकीला धडक ; कणकवलीत गडनदी पुलानजीक घटना ; दुचाकी वरील आई व मुलगा गंभीर जखमी
🛑 ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत ; संतप्त वाहन चालक आणि कणकवलीकरांनी महामार्ग धरला रोखून
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : बाबल घाटकर
🎴कणकवली, दि-१४:- वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रक चालकाने कणकवलीत गडनदी पुलानजीक कणकवली ते हळवल जाणाऱ्या दुचाकीला उडवले. यात दुचाकीवरील महिला सोनाली जाधव वय 32 वर्ष व तिचा मुलगा दक्ष जाधव वय 10 वर्ष बालक गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे हा ट्रकचालक मद्यधुंद असून दुचाकी फरपटत सुमारे दीडशे मीटर अंतरावर हळवल फाट्यावर आणली.हा प्रकार एसटी चालकाने पाहताच एसटी आडवी लावून ट्रक थांबवला.हा अपघात गुरुवारी रात्री सात चाळीस चा सुमारास मुंबई -गोवा महामार्गावर विजयभवन नजीक गडनदी पुलावर घडला. हळवल फाट्यावर वारंवार अपघात होत असून याबाबत उपाययोजना होत नसल्याने संतप्त वाहन चालक आणि कणकवलीकरांनी महामार्ग रोखून धरला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने महामार्गावर लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत .
हळवल येथील एक महिला आपल्या दहा वर्षाच्या मुलासह दुचाकीवरून कणकवली ते हळवल जात होती .विजय भवन नजीक सर्विस रोड वरून ती गडनदी पुलावर जात असताना मागून आलेल्या वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रक चालकाने पुढे जात असलेल्या कसवण एसटीला घासत दुचाकीला उडवले .त्यात महिला आणि तिचा मुलगा दुचाकीवरून फेकले जाऊन गंभीर जखमी झाले . ट्रक चालकाने ट्रक खाली दुचाकी अडकलेली असतानाच ती फरफटत सुमारे दीडशे मिटर अंतरावर हलवळ फाट्यापर्यंत नेली. . तेथे आमचे वेंगुर्ला प्रतिनिधी बाबल घाटकर. सिंधुदुर्ग चालक असोसिएशन अध्यक्ष विजय जांभळे व पत्रकार आबा खवणेकर हे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेण्यासाठी जात असताना त्यांनी हा अपघात बघितला व ताबडतोब स्वतः चा एर्टिगा कार ने जखमी महिला आणि बालकाला उपचारासाठी नागवेकर रुग्णालयात नेले. तर त्यांना पुढील उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले.
दरम्यान हळवल फाट्यावर अपघात झाल्याचे समजतात कणकवलीकरानी धाव घेत मोठी गर्दी केली .अपघात करणाऱ्या ट्रकचालकला चांगला चोप ददिला. पोलीसही घटनास्थळी पोहोचले. मात्र या हळवल फाट्यावर जोपर्यंत ठोस उपाययोजना होत नाहीत तोपर्यंत महामार्गावरून वाहतूक सुरू करू देणार नाही असा पवित्रा घेत महामार्ग रोखून धरल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

