🛑बांद्यात संत सोहिरोबानाथ जयंती सोहळा उत्साहात
*🛑बांद्यात संत सोहिरोबानाथ जयंती सोहळा उत्साहात*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- १४:-* बांदा येथिल श्री संत सोहिरोबानाथ आंबिये मठामध्ये गुरुप्रतिपदेला संत सोहिरोबानाथ जयंती सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा झाला. यानिमित्त मठात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या जयंती सोहळ्या पासुन श्रीरामनवमीपर्यंत मठात नाथ सेवा उत्सव चालणार आहे.
गुरूवारी सकाळी संत सोहिरोबानाथांच्या मुळ पादुकांची पुजा अर्चा,अभिषेक होऊन दर्शन व तीर्थप्रसादास प्रारंभ झाला.त्यानंतर संत सोहिरा चरित्रामृताचे वाचन झाले.दुपारी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती झाली व महाप्रसादास आरंभ झाला. यावर्षी जयंतीदिनी गुरुवार आल्याचे औचित्य साधून सेवेकरी मंडळींच्या वतीने हा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता.सायंकाऴी 5 वाजता स्थानिक महिलांची भजन सेवा झाली.7.15 ला नित्य सायंआरती व त्यानंतर स्थानिक भजनकर्मींची भजनसेवा झाली.
नाथांच्या जयंतीपासून नाथ सेवा उत्सव आरंभ झाला आहे.नित्य मंगळवारची भजन सेवा व गुरुवारची दुपारची आरती यांच्यासह उत्सवकाळात दर मंगळवारी सायं 5 ते 6 या वेळेत श्रीराम नामाचा जप होणार आहे. तसेच दर गुरुवारी सायंकाळी 5 ते 6 महिला भजनकर्मींची भजनसेवा होणार आहे.हा नाथ सेवा उत्सव नाथांचा निर्वाणदिन असलेल्या रामनवमीपर्यंत चालणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

